ममता लांजेवार/ रायपूर, 12 मे : छत्तीसगड (chhattisgarh) राज्याचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) यांची प्रकृती गंभीर आहे. ते कोमात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना ऑडिओ थेरेपी (Audio therapy) दिली जात आहे. ज्यामार्फत त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकवली जात आहे.
9 मे रोजी अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सलग चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर आहे. रायपूरच्या श्री नारायणा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मेंदू कार्य करत नाही आहे आणि ते कोमात आहे. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.
हे वाचा - आता डिलिव्हरीआधी प्रत्येक प्रेग्ननंट महिलेची Corona Test; 'या' राज्य सरकारचा निर्णय
श्री नारायणा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील खेमका यांनी न्यूज 18 ला सांगितलं, "74 वर्षांचे अजीत जोगींची प्रकृती मंगळवारीही चिंताजनक आहे. त्यांचे हार्ट, ब्लड प्रेशर आणि युरिनचे आऊटपूट नियंत्रणात आणण्यात आलं आहे. मात्र न्यूरोलॉजिकल कार्यप्रणाली कार्य करत नाही आहे. म्हणजेच त्यांचा मेंदू कार्य करत नाही आहे. त्यांना वेंटिलेटरमार्फत श्वास दिला जातो आहे. शिवाय त्यांच्या ब्रेन अॅक्टिव्हिटीसाठी त्यांना ऑडिओ थेरेपीही दिली जाते आहे. ज्यामार्फत त्यांना 70 च्या दशकातील त्यांची आवडती गाणी ऐकवली जात आहेत. यामध्ये 5 हजार गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी त्यांना कमी आवाजात ऐकवली जात आहेत."
हे वाचा - Covid - 19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस
"सध्या तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे. मेडिकल प्रोटकॉलनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 ते 48 तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत", असं डॉ. खेमका म्हणाले.
अजित जोगी हे काँग्रेसचे खंदे नेते आहेत, पण काही काळापूर्वी झालेल्या अपघातात त्यांचा पाय अधू झाला होता. तेव्हापासून जोगी व्हीलचेअरवर आहेत.
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh