जाहिरात
मराठी बातम्या / देश / Chandrayaan-3 launch: चांद्रयान 3 ची तयारी पूर्ण, बस्स आता काही मिनिटं शिल्लक; ISRO पुन्हा एकदा रचणार इतिहास

Chandrayaan-3 launch: चांद्रयान 3 ची तयारी पूर्ण, बस्स आता काही मिनिटं शिल्लक; ISRO पुन्हा एकदा रचणार इतिहास

Chandrayaan-3 launch: चांद्रयान 3 ची तयारी पूर्ण, बस्स आता काही मिनिटं शिल्लक;  ISRO पुन्हा एकदा रचणार इतिहास

Chandrayaan-3 launch ISRO Moon Mission : इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. उशीर झाल्यास, इस्रो सप्टेंबरसाठी लँडिंगचं वेळापत्रक बनवू शकतं.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जुलै : बस्स…आता काही मिनिटांचा अवधी आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-३ चं प्रक्षेपण होणार आहे. याआधीही भारताकडून दोनदा प्रयत्न करण्यात आले होते. यंदा मात्र चांद्रयान-३ सुरक्षितपणे चंद्रापर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चंद्रावर जात असलेलं चांद्रयान -३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान- 3 मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. चांद्रयान २ मध्ये अपयश मिळाल्यानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत तंत्रज्ञानात किती पुढे आहे हे दाखवून देण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. चांद्रयान-३ मिशनच्या प्रक्षेपणाची टाइमलाइन प्रक्षेपण - चांद्रयान 3 आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे. 2xS200 इग्निशन - रॉकेट इंजिन 0 सेकंदात प्रज्वलित होतील. L110 इग्निशन - L110 इंजिन 108 सेकंदात प्रज्वलित होतील. 2xS200 पृथक्करण - दोन बाजूचे बूस्टर (2xS200) लॉन्च झाल्यानंतर 127 सेकंदानंतर वेगळे होतील. PLF सेपरेशन - पेलोड फेअरिंग 195 सेकंदांनी वेगळं होईल. L110 सेपरेशन - L110 इंजिन 306 सेकंदात वेगळं होतील. C25 इग्निशन - C25 इंजिन 308 सेकंदात प्रज्वलित होतील. C25 शट-ऑफ - C25 इंजिन 954 सेकंदांनी बंद होतील. उपग्रह सेपरेशन - 969 सेकंदात उपग्रह रॉकेटपासून वेगळं होईल. Chandrayan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेआधी इस्रोची टीम बालाजीच्या दर्शनाला, अर्पण केली खास गोष्ट चंद्रापर्यंतचा प्रवास- प्रक्षेपणानंतर मॉड्यूल चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे एक महिना अंतराळात प्रवास करेल. मून लँडिंग - इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. उशीर झाल्यास, इस्रो सप्टेंबरसाठी लँडिंगचं वेळापत्रक बनवू शकतं. लँडर आणि रोव्हर मिशन लाइफ - लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी (14 पृथ्वी दिवस) काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात