बेंगळुरू, 14 नोव्हेंबर: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO एका बाजूला चांद्रयान-3 मोहीमे(Chandrayaan-3)च्या तयारीला लागले आहे. काहीच दिवसांपूर्वी ISROने चांद्रयान-2 ही मोहीम राबवली होती. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी ISROने केलेल्या कामगिरीचे कौतुक संपूर्ण जगाने केले होते. भारताच्या या चांद्रयान -2 मोहीमेतील ऑर्बिटर(Orbiter) चंद्रा(Moon)चे फोटो नियमीतपणे पाठवत आहे. चांद्रयान-2मधील ऑर्बिटरने आता चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर असा फोटो पाठवला आहे. चांद्रयान-2मधील टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याद्वारे क्रेटर के थ्री डी क्यू चंद्राचा हा फोटो 100 किलोमीटर अंतरावरून हा फोटो काढण्यात आल्याचे ISROने म्हटले आहे. या फोटोत चंद्रावरील एक मोठा खड्डा दिसत आहे. या फोटोच्या अभ्यासातून चंद्रावर जीवसृष्टी आहे की नाही यासंदर्भातील शक्यचा तपासली जाऊ शकते. चंद्रावरील खड्ड्यांचा अभ्यास भविष्यातील संशोधनासाठी होऊ शकतो. चांद्रयान-2मधील लँडर विक्रम भलेही चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग करू शकले नसले तरी ऑर्बिटर सातत्याने चंद्राचे फोटो पाठवत आहे. ISROचे चेअरमन शिवन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की चांद्रयान-2 मोहीम 98 टक्के यशस्वी झाली आहे.
नोव्हेंबर 2020मध्ये पाठवणार चांद्रयान -3
पुढील वर्षी म्हणजे 2020मध्ये ISRO चांद्रयान-3 ही मोहीम राबवणार आहे. ISROमधील वैज्ञानिक सध्या चांद्रयान-3च्या तयारीत लागले आहेत. या मोहीमेत केवळ लँडर आणि रोव्हर पाठवले जाणार आहे. चांद्रयान-2 मोहीमेप्रमाणे यात ऑर्बिटर असणार नाही. या मोहीमेसाठी चांद्रयान-2च्या ऑर्बिटरचा वापर केला जाणार असल्याचे समजते. हा ऑर्बिटर सात वर्षे काम करणार आहे. चांद्रयान-3 मोहीमेत लँडरचे पाय अधिक मजबूत केले जाणार आहेत. VIDEO : संजय राऊत यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, म्हणाले…

)







