12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा; हरियाणा सरकारचा निर्णय

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद हरियाणा विधानसभेत करण्यात आली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2018 08:44 AM IST

12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा; हरियाणा सरकारचा निर्णय

16 मार्च : अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर हरियाणा सरकारं मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद हरियाणा विधानसभेत करण्यात आली आहे. यासाठी कायद्यात योग्य त्या सुधारणा मंजूर करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर असा कायदा करणारं हरियाणा हे तिसरं शहर ठरलं आहे.

कायद्यातील या फेरबदलामुळे 12 वर्षांपर्यंतच्या वयाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. यापुर्वी राजस्थान विधानसभेत यासंबंधीचं विधेयक मंजुर करण्यात आलं होतं. हरियाणात चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत होत्या. आणि या सगळ्यात हरियाणा सरकारला टीकेला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हरियाणाच्या जनतेकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. कारण या कठोर कायद्याने नराधमांवर आळा बसणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 08:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...