Home /News /national /

पगार 20 हजार पण संपत्ती कोट्यवधींच्या घरात, इडीची क्लार्कवर कारवाई

पगार 20 हजार पण संपत्ती कोट्यवधींच्या घरात, इडीची क्लार्कवर कारवाई

पगरापेक्षा त्यांच्याकडे वाढत चाललेल्या संपत्तीनं अनेक सवाल उपस्थित झाले आहे त्यांच्यावर ईडीकडून कारवाई कऱण्यात आली आहे.

    कोलकाता, 18 एप्रिल: देशभरात एकीकडे कोरोनानं थैमान घातलं आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं कटेकोरपणे पालन केलं जात आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पोलीस, डॉक्टर आणि प्रशासन यंत्रणा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांना आणि गरजूंना देशभरातून विविध स्तरातून आर्थिक, अन्न, कपडे अशा विविध पद्धतीची मदत येत असतानाच दुसरीकडे धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत कारकून म्हणून काम करणाऱ्या क्लार्कच्या घरावर आणि बँकेवर ईडीचीनं धाड टाकली असून क्लार्कची सर्व खाती सील केली आहेत. कोलकाता इथे क्लार्क म्हणून काम करत असलेल्या स्नेहशिष कार यांची 1.7 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लोकमत वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार स्नेहाशिष यांच्या बँक खात्यावर अनेक महिने वेतनाची रक्कम पडून होती. वेतन काढलं जात नाही मग उत्पन्नाचा स्रोत काय याचा सुगावा लावण्यासाठी त्यांच्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्यानं स्नेहाशिष कार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोस्ट खाती, बँक खाती, जीवन विम्याच्या पॉलिसी आणि त्यांचे प्लास्ट, अपार्टमेंट सील करण्यात आले आहेत. सध्या ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. हे वाचा-भारतात जोरदार सुरू आहे कोरोनावर वॅक्सिन बनवायचं काम, शास्त्रज्ञांनी दिली माहिती इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार स्नेहाशिष कार हे 1981 मध्ये CGHS कोलकाता इथे वॉटरमन म्हणून रूजू झाले होते. 1982 साली र्सिंग अटेंडेंट कर्मचारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. 2017 पासून त्यांच्याकडे डिव्हिजन क्लर्क म्हणून काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आली. पगार 20 हजार होता पण संपत्ती कोट्यवधींची. त्यांनी वेतन खात्यातून अनेक महिने पगार न काढल्यानं शंका आली. पगरापेक्षा त्यांच्याकडे वाढत चाललेल्या संपत्तीनं अनेक सवाल उपस्थित झाले आहे त्यांच्यावर ईडीकडून कारवाई कऱण्यात आली आहे. हे वाचा-'मम्मी माझी काळजी करू नको'; 5 वर्षांच्या मुलाने कोरोना वॉरिअर आईला दिलं बळ
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या