नवी दिल्ली, 27 जुलै: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट (Central Govt. Employee To Get Promotion Soon) मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. सरकार पदोन्नतीच्या संदर्भात गंभीर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यात व्यक्तीगत लक्ष घातलं आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिनिधी मंडळाला सांगितल्याचं पीआयबीनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सरकारी नोकरी: परराष्ट्र मंत्रालयात जॉबची सुवर्णसंधी सोडू नका; मिळेल तब्बल 2 लाख रुपये पगार; लिंकवर करा अर्ज नुकतीच 1 जुलै 2022 रोजी केंद्रातील 8 हजारपेक्षा जास्त अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्याआधी केंद्रातील विविध मंत्रालयं व विभागांमध्ये प्रशासकीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 2019मध्ये पदोन्नती मिळाली होती. तिन्ही सेवांमधील सुमारे 4 हजार अधिकाऱ्यांना ही पदोन्नती देण्यात आली होती. आता आणखी काही अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती न मिळताच निवृत्त व्हावं लागणं ही खूप निराशाजनक बाब असल्याचं डॉ. जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी या वेळी सांगितलं. जुलैच्या सुरुवातीला ज्या 8,089 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची घोषणा झाली होती, त्यांच्या पदोन्नतीबाबतच्या सर्व कायदेशीर अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुढे भविष्यातील सर्व पदोन्नती सुरळीत होतील, असंही ते म्हणाले. केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा ग्रुप – A च्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळानं केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन पदोन्नतीची मागणी केली होती. त्या बैठकीत डॉ. सिंह यांनी पदोन्नतीचा विषय लवकर मार्गी लावला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत सरकारनं तयारी केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार येत्या दोन-तीन आठवड्यात पदोन्नतीबाबत घोषणा करेल. Telephone Interview देणार आहात? मग कसं बोलाल? कसं वागाल? अशी करा संपूर्ण तयारी 1 जुलै 2022 रोजी केंद्र सरकारनं तीन केंद्रीय सचिवालय संवर्गातील 8,089 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय सचिवालय ही प्रशासकीय नागरी सेवांपैकी एक सेवा आहे. यात ग्रुप A आणि ग्रुप B अशा दोन्ही पदांवर काम करणारे अधिकारी असतात. आता डॉ. सिंह यांच्या घोषणेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता केंद्र सरकारकडून पदोन्नतीची घोषणा कधी केली जाते, याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.