मराठी बातम्या /बातम्या /देश /

... तर Lockdown पुन्हा जाहीर करा, मोदी सरकारचा राज्यांना इशारा

... तर Lockdown पुन्हा जाहीर करा, मोदी सरकारचा राज्यांना इशारा

यापुढं ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे.

यापुढं ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे.

यापुढं ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 14 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असताना देशातील अनेक राज्यांत सध्या निर्बंध (restrictions) शिथील होत असल्याचं चित्र आहे. मात्र या सवलतीचा अनेक नागरिक गैरफायदा घेत असल्याचं चित्र असून कोरोना नियमांचं उल्लंघन होण्याच्या (violation of rules) घटनांमध्ये वाढ होत आहे. यापुढं ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन (lockdown) सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे.

इशारा देण्याची वेळ

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक पर्यटक घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. विशेषतः देशभरात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असून मास्क न घालता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता पर्यटक जागोजागी गर्दी करत असल्याचं चित्र आहे. काही राज्यांमध्ये बाजारपेठा, दुकानं आणि मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडत असल्याचं चित्र असून या गोष्टी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ईशान्येकडील राज्यांबाबत चिंता

ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे आणि आता पर्यटनासाठी राज्यांच्या सीमा खुल्या झाल्यामुळे पर्यटकांची झुंबड उडाली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयानं काढलेल्या पत्रकात या बाबीचा ठोस उल्लेख करण्यात आला आहे. राज्यांना व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी ते करताना कोरोनाबाबतच्या निकषांचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणं बंधनकारक असल्याची आठवण या पत्रातून करून देण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन झालं नाही, तर पुन्हा त्या भागात लॉकडाऊन केलं जाईल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

हे वाचा -COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात?

गर्दीच्या ठिकाणी लक्ष असुद्या

बाजारपेठा, मॉल्स, पर्यटन ठिकाणं, थिएटर्स, रेस्टॉरंट्स, मंडई, लग्नसोहळे, रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिम, बागा आणि मैदानं या सर्व ठिकाणांवर स्थानिक प्रशासनानं लक्ष ठेवावं आणि त्यातील कुठेही गर्दी होताना दिसली, तर तिथं लॉकडाऊन करावं, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत.

First published:

Tags: Central government, Coronavirus, India, Wave