मराठी बातम्या /बातम्या /देश /

केंद्राकडून ‘टूर ऑफ ड्युटी’च्या घोषणेची शक्यता, 4 वर्षांसाठी सैन्यात सामील होण्याची संधी, काय असेल पगार आणि सुविधा?

केंद्राकडून ‘टूर ऑफ ड्युटी’च्या घोषणेची शक्यता, 4 वर्षांसाठी सैन्यात सामील होण्याची संधी, काय असेल पगार आणि सुविधा?

नियमांनुसार सहा महिन्यांच्या अंतराने दरवर्षी दोनदा सैनिकांची भरती केली जाईल. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर 25 टक्के सैनिकांना पुन्हा सैन्यात सामील केलं जाईल.

नियमांनुसार सहा महिन्यांच्या अंतराने दरवर्षी दोनदा सैनिकांची भरती केली जाईल. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर 25 टक्के सैनिकांना पुन्हा सैन्यात सामील केलं जाईल.

नियमांनुसार सहा महिन्यांच्या अंतराने दरवर्षी दोनदा सैनिकांची भरती केली जाईल. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर 25 टक्के सैनिकांना पुन्हा सैन्यात सामील केलं जाईल.

नवी दिल्ली 08 जून : देशाची सेवा करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. अनेक तरुण भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहतात आणि मेहनत करून स्वप्न पूर्णही करतात. देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या 'टूर ऑफ ड्युटी' अंतर्गत भारतातील तरुणांना देशसेवेची संधी देण्याची प्रक्रिया भारत सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकार (8 जून 22) बुधवारपासून सशस्त्र दलांसाठी सैनिकांच्या भरतीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्याची शक्यता आहे. याचाच भाग म्हणून आज ‘टूर ऑफ ड्युटी’ची घोषणा होण्याची शक्यताही आहे. काय आहे ‘टूर ऑफ ड्युटी’? ‘टूर ऑफ ड्युटी’ (Tour of Duty system) सिस्टिमअंतर्गत चार वर्षांसाठी सैन्य दलांत सैनिकांची भरती केली जाईल. सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना करमुक्त पद्धतीने 10 लाख रुपये दिले जातील आणि त्यांच्या सेवांसाठी प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा दिला जाईल. ‘टूर ऑफ ड्युटी’ला 'अग्निपथ' नाव दिलं जाण्याची शक्यता आहे, तर सैनिकांना 'अग्नीवीर' असं संबोधलं जाईल. तीन सेवांमध्ये अधिकारी रँकच्या खालच्या दर्जासाठी दरवर्षी सुमारे 45 हजार ते 50 हजार 'अग्निवीर' भरती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. केंद्राचं दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण; 24 तासात मारले गेले 4 दहशतवादी ‘टूर ऑफ ड्युटी’साठी पात्रता काय? इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नियमांनुसार सहा महिन्यांच्या अंतराने दरवर्षी दोनदा सैनिकांची भरती केली जाईल. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर 25 टक्के सैनिकांना पुन्हा सैन्यात सामील केलं जाईल. या प्रक्रियेचं स्वरूप कसं असेल, हे अद्याप ठरलेलं नाही. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील उमेदवार ‘टूर ऑफ ड्युटी’साठी अर्ज करू शकतील आणि त्यांची भरती सध्याच्या पात्रता निकषांनुसार केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलंय. तसंच भरती झालेल्या सैनिकांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण (Training) दिलं जाईल आणि ते उर्वरित सहा महिन्यांसाठी सैन्यात सेवा देतील. सध्या एक सैनिक सैन्यात सुमारे 17 ते 20 वर्षे सेवा बजावतो. सैनिकांना मिळणारे वेतन आणि सुविधा नवीन योजनेंतर्गत भरती करण्यात आलेल्या सैनिकांचा सुरुवातीचा पगार 30 हजार रुपये असेल, जो चौथ्या वर्षाच्या अखेरीसपर्यंत 40 हजार रुपये होईल. दरम्यान, सेवा निधी योजनेंतर्गत पगारातील 30 टक्के रक्कम बचत म्हणून ठेवण्यात येईल, तसंच सरकारकडून दरमहा इतकीच दुसरी रक्कमही दिली जाईल. चार वर्षं झाल्यावर सैनिकाला 10 ते 12 लाख रुपये दिले जातील. महत्त्वाचं म्हणजे सैनिकांना मिळणारा हा पैसा पूर्णपणे करमुक्त असेल. ‘टूर ऑफ ड्युटी’साठी घेतलेलं प्रशिक्षण आणि कौशल्यं लक्षात घेऊन सैनिकांना डिप्लोमा (Diploma) किंवा क्रेडिट देऊन सन्मानित केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना त्याचा उपयोग पुढील शिक्षणासाठी करता येईल, असं सूत्रांनी सांगितलं. राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! सुरक्षा ताफ्यातीन दोन वाहने वाट चुकली अन्.. दरम्यान, चार वर्षांच्या सेवेनंतर या सैनिकांना त्यांच्या सामान्य जीवनात परतण्यासाठी सरकार मदत करेल. या नवीन योजनेच्या माध्यमातून सैन्यदलाशी संबंधित अनेक प्रश्न सुटण्याची शक्यता सरकारला वाटत आहे. यासोबतच सैन्य (Indian Army), नौदल (Navy) आणि हवाई दलात (Air Force) भरती होऊ इच्छिणाऱ्या लाखो तरुणांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांत तिन्ही सेवांसाठी जवळपास कोणतीही सैन्य भरती झालेली नाही. संरक्षण मंत्रालयाने 28 मार्च रोजी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सैन्यात इतर श्रेणीतील कनिष्ठ कमिशन्ड अधिकाऱ्यांसाठी एक लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे सरकारने जर ‘टूर ऑफ ड्युटी’ची सुरुवात करत भरती प्रक्रिया सुरू केली, तर गेल्या 2-3 वर्षांपासून सैन्यभरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांना दिलासा मिळेल. शिवाय या सिस्टिमचा कालावधी फक्त चार वर्षांचा असल्याने आणखी तरुण सैन्यभरतीसाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
First published:

Tags: Army, Indian army

पुढील बातम्या