Home /News /national /

गुजरात दंगलीबाबतच्या त्या प्रश्नामुळे CBSE वादाच्या भोवऱ्यात; ट्विट करून मागितली माफी

गुजरात दंगलीबाबतच्या त्या प्रश्नामुळे CBSE वादाच्या भोवऱ्यात; ट्विट करून मागितली माफी

“2002 साली कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?” असा प्रश्न (CBSE question on Gujrat riots) या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता

नवी दिल्ली 02 डिसेंबर : सीबीएसई बोर्डाची 10वी आणि 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे. यातल्या 12वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पेपरमधल्या (CBSE Sociology Question Paper) एका प्रश्नामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. यासाठी सीबीएसईने ट्विटरवर जाहीर माफी (CBSE Question Paper Controversy) मागितली आहे. तसंच यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. “2002 साली कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?” असा प्रश्न (CBSE question on Gujrat riots) या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या खाली भाजप, काँग्रेस, डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले होते. यातला एक पर्याय निवडायचा होता. या प्रश्नामुळे पेपर झाल्यानंतर मोठा वाद (CBSE sociology controversy) निर्माण झाला. त्यानंतर सीबीएसईने ट्विटरवर याबाबत माफी मागितली. “आजच्या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा असून, सीबीआयच्या पेपर सेटिंगच्या नियमावलीचं उल्लंघन (CBSE tweet over sociology question paper) करणारा आहे. या प्रकरणाची दखल घेतली गेली असून, यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल,” अशा आशयाचं ट्विट सीबीएसईने (CBSE tweet) केलं होतं. “प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी केवळ अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची निवड करावी; तसंच लोकांच्या भावना दुखावतील असे सामाजिक, राजकीय प्रश्न टाळावेत असं सीबीएसईची मार्गदर्शक तत्त्वं म्हणतात,” असंही सीबीएसईने दुसऱ्या एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं. सीबीएसई बोर्डाने याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रश्न बारावीच्या एनसीईआरटीच्या समाजशास्त्रातल्या पुस्तकानुसारच आहे. “सांस्कृतिक विविधतेसमोरची आव्हानं” या धड्यामधल्या एका परिच्छेदामध्ये देशातल्या धार्मिक दंगली, आणि त्यातली संबंधित राज्य सरकारांची भूमिका याबद्दल मत मांडलं आहे. धार्मिक हिंसाचार वाढण्यामध्ये सरकारही काही प्रमाणात दोषी असतंच, अशा आशयाचा हा परिच्छेद आहे. यात उदाहरण म्हणून 1984 साली काँग्रेस काळात दिल्लीमध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली आणि 2002 साली गुजरातमध्ये झालेला मुस्लिमविरोधी हिंसाचार याचा उल्लेख करण्यात आला आहे. सीबीएसईची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी सब्जेक्ट एक्सपर्ट आणि पेपर मॉडरेटर अशी दोन पॅनेल्स असतात. या सब्जेक्ट एक्सपर्ट्सची ओळख गोपनीय ठेवण्यात येते. अगदी या पॅनेलमध्ये असणाऱ्या व्यक्तींनाही आपल्या व्यतिरिक्त इतर कोण-कोण या पॅनेलवर आहे याबाबत माहिती नसते. शिवाय, पेपर सेटर्सनी आपापल्या प्रश्नपत्रिका जमा केल्यानंतर त्यातली कोणती अंतिम असेल याबाबतही कोणाला माहिती नसते. यानंतर मॉडरेटर्स सर्व प्रश्न नियमांनुसार योग्य असल्याची खातरजमा करतात. एवढी मोठी प्रक्रिया असूनही हा वादग्रस्त प्रश्न अंतिम प्रश्नपत्रिकेत कसा आला याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
First published:

Tags: CBSE, Gujarat, The controversial statement

पुढील बातम्या