नवी दिल्ली, 30 जून : शहरांतर्गत वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. अनेक शहरांमध्ये मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत. काही शहरांमध्ये मेट्रो सुरूदेखील आहे. मेट्रो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या दिल्ली मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय असाच चर्चेत आहे. दिल्ली मेट्रोतून आता प्रवासी मद्याच्या बाटल्या घेऊन जाऊ शकणार आहेत. मेट्रो व्यवस्थापनाने तशी परवानगी प्रवाशांना दिली आहे; मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयाविषयी सविस्तर जाणून घेऊ या. दिल्लीतून मेट्रोने प्रवास करणाऱ्या मद्यप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. आता दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना प्रवासी आपल्या सामानासोबत दारूच्या बाटल्या घेऊन जाऊ शकणार आहेत. मेट्रोतून सामानासह दारूच्या बाटल्या नेण्यासंबंधीच्या निर्णयास दिल्ली मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाने शुक्रवारी (30 जून 23) परवानगी दिली आहे. पूर्वी ही परवानगी ठराविक मार्गाकरिता होती; पण आता सर्व मार्गांसाठी नवीन निर्णय लागू असेल.
त्यामुळे दिल्ली मेट्रोतून प्रवास करणारे प्रवासी सोबत दारूची बाटली नेऊ शकतात. त्यासाठी मेट्रो व्यवस्थापनाने काही अटी ठेवल्या आहेत. Viral Video : दिल्ली मेट्रोत पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा, चेंगराचेंगरीत दोघांची हाणामारी `लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम`च्या वृत्तानुसार डीएमआरसीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे मुख्य कार्यकारी संचालक अनुज दयाल यांच्या वतीने शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे, की पूर्वीच्या आदेशानुसार एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइन वगळता दिल्ली मेट्रोमधून मद्य घेऊन जाण्यावर बंदी होती. तथापि सीआयएसएफ आणि डीएमआरसी अधिकाऱ्यांच्या समितीने यादीचं पुनरावलोकन केल्यानंतर आणि सुधारित यादीनुसार, आता एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर लागू असलेल्या तरतुदींनुसार प्रवाशांना दिल्ली मेट्रोमध्ये प्रति व्यक्ती दारूच्या दोन बाटल्या नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. Viral Video: कपलच्या त्या कृतीने संतापल्या महिला, मेट्रोमध्ये पेटलं भांडण मेट्रोमधून प्रवाशांना दारूच्या बाटल्या नेण्याची सुविधा यापूर्वी फक्त दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर उपलब्ध होती. परंतु, निर्बंधांचं पुनरावलोकन केल्यानंतर डीएमआरसी व्यवस्थापनाने आता इतर सर्व मार्गांवर नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दारूच्या दोन बाटल्या सोबत नेता येणार आहेत; मात्र प्रवाशांना सामानासोबत दारूच्या केवळ सीलबंद बाटल्याच नेता येणार आहेत. दिल्ली मेट्रोच्या या नवीन निर्णयाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.