Home /News /national /

धक्कादायक! वधू-वराची कार नदीत गेली वाहून, संसार थाटण्याआधीच...

धक्कादायक! वधू-वराची कार नदीत गेली वाहून, संसार थाटण्याआधीच...

मिळालेल्या माहितीनुसार ही कार पाण्याच्या प्रवाहासोबत 200 मीटर दूर गेली होती.

    पलामू, 21 जून : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना घडली आहे. नवीन लग्न झालेल्या वधू-वराला घेऊन जाणारी कार नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याची अचानक पातळी वाढल्यानं ही दुर्घटना घडली. झारखंडमध्ये पलामू मलय नदीच्या पुलावर हा प्रकार घडला आहे. नवीन संसार थाटण्याआधीच मोडतोय का अशी भीती होती. पण ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तिथे असलेल्या ग्रामस्थानी लोकांनी नदीत उडी घेतली आणि सर्वांना गाडीतून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. शनिवारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वर-वधू घरी जात असताना रविवारी सकाळी घडला. या कारमध्ये कार चालकासह 5 जण होते. वधू-वराला वाचवण्यात ग्रामस्थांना यश मिळालं आहे. कार जात असताना अचानक पाण्याची पातळीवाढल्यानं पाणी रस्त्यावर आलं आणि प्रवाह जास्त वेगानं असल्यानं कारही त्यामध्ये वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार ही कार पाण्याच्या प्रवाहासोबत 200 मीटर दूर गेली होती. पाण्याचा प्रवाह वेगानं वाढत होता. दोरीच्या साहाय्याने वधू-वर आणि कारमधील 5 लोकांचे प्राण वाचवले आहेत. कारमधील लोकांनी काच उघडली असती तर कारमध्ये पाणी शिरलं असतं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती मग वाचवणं मुश्कील झालं असतं. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    पुढील बातम्या