२०३५पर्यंत दिल्लीची लोकसंख्या कोणालाच झेपणार नाही !

२०३५पर्यंत दिल्लीची लोकसंख्या कोणालाच झेपणार नाही !

लोकसंख्या वाढीचं प्रमाण सध्या इतकं वाढलं आहे की, दिल्लीची लोकसंख्या २०३5 सालापर्यंत ४.५ करोडने वाढू शकते तर हीच लोकसंख्या 2050पर्यंत भारताच्या फक्त शहरी भागांत पहायला मिळेल.

  • Share this:

मुंबई, 18 मे : लोकसंख्या वाढीचं प्रमाण सध्या इतकं वाढलं आहे की, दिल्लीची लोकसंख्या २०३5 सालापर्यंत ४.५ करोडने वाढू शकते तर हीच लोकसंख्या 2050पर्यंत भारताच्या फक्त शहरी भागांत पहायला मिळेल, असा रिपोर्ट यूएनकडून देण्यात आला आहे.

यूएनच्या पॉप्यूलेशन डिव्हिजन रिपोर्टनुसार विचार केला तर 2015मध्ये दिल्लीची लोकसंख्या 25.9 दशलक्ष इतकी होती. पण 2035मध्ये ही लोकसंख्या 67 टक्क्यांनी वाढलेली पहायला मिळेल. आणि तो आकडा 4 करोड 30 लाखांच्या घरात जाऊ शकतो.

लोकसंख्येबाबत दिल्लीच काय तर मुंबईचीसुद्धा तीच अवस्था आहे. 2015मध्ये मुंबईची लोकसंख्या 1.9 करोड इतकी होती. हा आकडा 2035 पर्यंत 2.70 करोडवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढच्या 20 वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या 41.6 टक्क्यांनी वाढली जाण्याची शक्यता आहे. लोकसंख्या वाढीचा हा टक्का वाढूही शकतो. तर २०३५पर्यंत कोलकात्याची लोकसंख्या ३५ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

यूएनच्या रिपोर्टेनुसार २०५०पर्यंत भारतातील ५२.०८ टक्के लोकसंख्या ही फक्त शहरी भागात पहायला मिळेल. तर हाच टक्का २०१५मध्ये ३२.०८ टक्के इतका होता. त्यामुळे शहरांचं मोकळेपण तर आपण आधीच गमावलं आहे, पण काही दिवसांनी आपण आपल्या घरात गर्दी झाल्याचं अनुभवल्याशिवाय राहणार नाही.

First published: May 18, 2018, 1:50 PM IST

ताज्या बातम्या