श्रीनगर, 27 फेब्रुवारी : भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांकडून आगळीक होण्याची शक्यता लक्षात घेऊन या विमानाकडून टेहळणी केली जात होती. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.