मराठी बातम्या /बातम्या /देश /नवविवाहितेला हव्या होत्या बांगड्या, बाजारात पतीचा हात सोडला अन् प्रियकरासोबत काढला पळ

नवविवाहितेला हव्या होत्या बांगड्या, बाजारात पतीचा हात सोडला अन् प्रियकरासोबत काढला पळ

बेकापूर संतोषी माता गली येथे राहणाऱ्या विवेक कुमारचा विवाह नौगढ़ी येथील मोनी कुमारीसोबत 14 जून रोजी झाला होता.

बेकापूर संतोषी माता गली येथे राहणाऱ्या विवेक कुमारचा विवाह नौगढ़ी येथील मोनी कुमारीसोबत 14 जून रोजी झाला होता.

बेकापूर संतोषी माता गली येथे राहणाऱ्या विवेक कुमारचा विवाह नौगढ़ी येथील मोनी कुमारीसोबत 14 जून रोजी झाला होता.

मुंगेर, 29 जून : बिहारमधील मुंगेरमधून (Munger Bihar) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लग्नाच्या आठवडाभरानंतरच नवविवाहित तरुणी नवऱ्यासोबत बांगड्या घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र, तिथूनच ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. (Bride run away with lover) नवविवाहितेने पतीसमोरच स्कॉर्पिओ गाडीतून (Scorpio Car) प्रियकरासह पळ काढला.

दरम्यान, पोलिसांनी लगेचच कारवाई करत विवाहित तरुणीला ताब्यात घेतले आहे. तसेच तिचा प्रियकर दिव्यांशु यालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे.

नेमकं काय घडलं - 

मिळालेल्या माहितीनुसार, बेकापूर संतोषी माता गली येथे राहणाऱ्या विवेक कुमारचा विवाह नौगढ़ी येथील मोनी कुमारीसोबत 14 जून रोजी झाला होता. विवेकने सांगितले की, 18 जून रोजी त्याची पत्नी त्याच्या माहेरी गेली होती. 21 जून रोजी ती परत आली. यानंतर 22 जून रोजी सायंकाळी ती आपल्या पतीसोबत बांगड्या खरेदीसाठी गेली होती. दीनदयाल चौकात आल्यानंतर तिने आपल्या पत्नीचा हात सोडवला आणि आपल्या प्रियकराचा हात पकडला. यानंतर स्कार्पियोमध्ये बसून पळ काढला.

हेही वाचा - मैत्रिणीवरच जडला जीव, तिने बोलणे बंद केले अन् मित्राने उचलले हे विचित्र पाऊल

प्रियकरासोबत 2020ला झाले होते लग्न - 

शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. 2016 पासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. 5 सप्टेंबर 2020ला त्यांनी चंडिका मंदिरात लग्नही केले होते. मात्र, त्यांच्या नातेवाईकांना हे लग्न मंजूर नव्हते. तसेच ते दोन्ही सोबत राहण्यासाठी परिवाराचा विरोध होता. या संपूर्ण प्रकारामुळेच एका आठवण्याआधी मोनीचे लग्न विवेक कुमार नावाच्या तरुणासोबत करण्यात आले होते. मात्र, लग्नाच्या आठवड्याभरातच ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.

First published:

Tags: Bihar, Crime news, Women extramarital affair