जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'काहीही झालं तरी...', पाठवणीवेळी नवरीबाईने केला नको तो हट्ट; नवरदेवाने थेट पोलिसात घेतली धाव

'काहीही झालं तरी...', पाठवणीवेळी नवरीबाईने केला नको तो हट्ट; नवरदेवाने थेट पोलिसात घेतली धाव

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

पाठवणीवेळी नवरीबाईने असं काही सांगितलं की ते ऐकून सर्वजण हैराण झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा, 11 जुलै : नवरदेव वाजतगाजत वरात घेऊन नवरीबाईच्या दारात आला. नवरीबाई नवरदेवासोबत मंडपात बसली, दोघांनीही सप्तपदी घेतली, सात जन्म एकमेकांची साथ देण्याची सात वचनं एकमेकांना दिली (Wedding news). अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. पण जेव्हा नवरीबाईची सासरी पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र ऐन वेळेला नवरीबाईने नको तो हट्ट केला. तिचा हट्ट ऐकून सर्वजण हैराण झाले. नवरदेवाने तर थेट पोलीस ठाण्यातच धाव घेतली (Bride refused to go in laws house). बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रतनपुरा गावातील हे प्रकरण. उखडा गावातील मुकेश कुमार 8 जुलैलावाजतगाजत वरात घेऊन रतनपुरा गावात आला. पण नवरीबाईला काही तो आपल्यासोबत घेऊन जाऊ शकला नाही. वरात घेऊन पुन्हा घरी जाण्याऐवजी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ त्याच्यावर ओढावली. याचं कारणही धक्कादायक आहे. हे वाचा -  ‘माझी, माझी’ म्हणत एका तरुणीसाठी आपसात भिडले 2 तरुण; पण समोर आलं तिचं भलतंच सत्य जेव्हा त्यांची सप्तपदी होत होती तेव्हा कुणीतरी नवरदेवाला चालता येत नाही असं सांगितलं. नवरीने ते ऐकलं पण त्याकडे तिने फार लक्ष दिलं नाही.  लग्न झाल्यानंतर नवरा-नवरीला घरात देवाच्या पूजेसाठी नेण्यात आलं. तेव्हा नवरी पुढे पुढे आणि नवरा मागे मागे चालत होता. जिने चढताना त्याचा तोलही ढासळत होता. सुरुवातीला नवरदेव दारू प्यायला असेल असा संशय नवरीबाईला वाटला. पण नंतर त्याच्या पायातच समस्या असल्याचं तिला समजलं. जेव्हा पाठवणीचा क्षण आला तेव्हा नवरीने नवरदेवासोबत सासरी जाण्यास नकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार लग्नाआधी ना तिने त्याला पाहिलं होतं, ना पसंत केलं होतं. कुटुंबाची इच्छा आणि त्यांच्या मर्जीनुसार ती लग्न करत होती. पण आता तो दिव्यांग आहे हे समजलं. त्याच्या पायात काहीतरी समस्या आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत राहिने पण याच्यासोबत बिलकुल राहणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलं. हे वाचा -  Shocking! महिलांची थुंकी पिण्यासाठी केल्या तब्बल 42 हत्या; सुपरपॉवर मिळत असल्याचा धक्कादायक दावा जेव्हा नवरीबाईने सासरी जायला नकार दिला तिला वऱ्हाडी जबरदस्ती गाडीत बसवत होते. पण गाडीतून उतरून पळून ती आपल्या घरी गेली.  त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. आज तक च्या रिपोर्टनुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात