जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'मी तुझी नव्हे, कुणा दुसऱ्याची आहे', लग्नाआधी वराला मेसेज करून वधू फरार, नेमकं काय घडलं?

'मी तुझी नव्हे, कुणा दुसऱ्याची आहे', लग्नाआधी वराला मेसेज करून वधू फरार, नेमकं काय घडलं?

फाईल फोटो

फाईल फोटो

शेजारचा गावातील एक मुलगा या वधूचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे.

  • -MIN READ Local18 Giridih,Jharkhand
  • Last Updated :

एजाज अहमद, प्रतिनिधी गिरिडीह, 12 जुलै : सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या तसेच अनैतिक संबंधातून फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. तर लग्नाआधी वधू किंवा वर फरार होत असल्याच्याही बातम्या तुम्ही वाचल्या असतील. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवस आधी मुलगी म्हणजेच नवरी तिच्या प्रियकरासह पळून गेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गिरिडीह जिल्ह्यातील तिसरी नावाच्या गावातून उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न 13 जुलै रोजी होणार होते. त्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. मुलीच्या हातात तिच्या भावी पतीच्या नावाची मेहंदीही तयार झाली होती. पण दोन्ही कुटुंबासह संपूर्ण गाव आश्चर्यचकित होईल, मुलगी असे काही करेल की हे कोणालाच माहीत नव्हते.

News18लोकमत
News18लोकमत

शेजारचा गावातील एक मुलगा या वधूचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे तिचे लग्न ठरलेले असताना ती आपल्या प्रियकरासोबत लग्नाच्या दोनच दिवस अगोदर घरातून पळून गेली. प्रेयसीचे हे कृत्य घरच्यांना कळताच त्यांना धक्काच बसला. यानंतर तिला दोन दिवसांत घरी आणून तिचे लग्न होईल, यासाठी घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, काहीही सापडले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पळून जाताना मुलीने आपल्या घरच्यांना याची माहिती दिली नसली तरी तिने तिच्या भावी वराला मेसेज करून याबाबतची माहिती दिली होती. सध्या ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली असून या तरुणीच्या या कृत्याने सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात