मराठी बातम्या /बातम्या /देश /EXCLUSIVE: 24 तासांत तिसऱ्या लस उत्पादकांनी केंद्राकडे केला इमर्जन्सी वापरासाठी अर्ज

EXCLUSIVE: 24 तासांत तिसऱ्या लस उत्पादकांनी केंद्राकडे केला इमर्जन्सी वापरासाठी अर्ज

कोरोनाची लस (Covid Vaccine) कधी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांना दिलासादायक बातम्या सोमवारी आल्या आहेत.

कोरोनाची लस (Covid Vaccine) कधी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांना दिलासादायक बातम्या सोमवारी आल्या आहेत.

कोरोनाची लस (Covid Vaccine) कधी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांना दिलासादायक बातम्या सोमवारी आल्या आहेत.

  नवी दिल्ली, 7 डिसेंबर : कोरोनाची लस कधी येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या देशवासीयांना दिलासादायक बातम्या सोमवारी आल्या आहेत. आपत्कालीन वापरासाठी किंवा Emergency Use Authorization साठी परवानगी मागणारा अर्ज आणखी एका लस उत्पादक कंपनीने केला आहे. फायझर (Pfizer) आणि पुण्याच्या सीरम पाठोपाठ (Serum Institute of India)   भारत बायोटेकने  (Bharat Biotech)लसीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानदी देण्यासंदर्भात अर्ज केला आहे. News18 ला याबाबत EXCLUSIVE माहिती मिळाली आहे. स्वदेशी लशीसंदर्भातली ही मोठी बातमी आहे.

  Pfizer ने सर्वप्रथम भारतात EUA साठी परवानगी मागितली होती. नंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील आपल्या 'कोविशिल्ड लशीच्या  आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आणि आता दिवसभरात तिसऱ्या लस उत्पादकांकडून बातमी आली आहे.

  गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे आला असून त्यावर तातडीने विचारविनिमय सुरू आहे. या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय दोन आठवड्यात होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

  कधी मिळणार लस?

  याचा अर्थ ख्रिसमसच्या आसपास भारतात कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबरचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 22 ते 26 डिसेंबरदरम्यान या दोन्ही लशींना परवानगी मिळून देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.

  कोरोनाची लस डिसेंबरच्या अखेरपर्यंत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच स्वदेशी लशीसंदर्भात मोठी अपडेट येत आहे. या हालचालींमुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय औषधी नियंत्रक (डीजीसीआय) वर अर्ज करणारी पहिली स्वदेशी कंपनी आहे. त्यानंतर भारत बायोटेकने नंबर लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डीजीसीआयला वैद्यकीय गरजा व लोकहिताचे व्यापक प्रमाण सांगून साथीच्या काळात 'कोविशिल्ड' लस मंजूर करण्याची विनंती केली आहे. शनिवारी अमेरिकन औषध निर्माता फायझर या भारतीय युनिटने देखील कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औपचारिक मंजुरीसाठी अर्ज केला होता.

  First published:
  top videos

   Tags: Corona vaccine, Coronavirus