लांब लांबपर्यंत कोणीच नसल्याने कोणीच त्याच्या मदतीसाठी आले नाही. नंतर त्याच्याकडे मोबाइल असल्याचे लक्षाच आले. मात्र पाण्यात भिजल्याने त्याचा मोबाइलही काम करीत नव्हता. जिथे तो पडला होता, त्याच्या जवळपास लोखंडाचे जुने स्टक्चर त्याला दिसले. तो कसाबसा त्या स्ट्रक्चरवर चढला आणि तेथेच बसून राहिला. काळा कुट्ट अंधार झाला होता. राजकिड्यांचा आवाजामुळे घाबरायलाच होत होते. संपूर्ण रात्र तो त्या लोखंडाच्या स्टक्चरवर बसून रहिला. पाण्यात पडल्याने त्याचे संपूर्ण कपडे ओले जात होते. शिवाय त्याला नीट पोहताही येत नसल्याने जागा मिळेल तिथेच बसून राहण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नव्हता. तो रात्रभर नदीच्या मधोमध बसून राहिला. शेवटी सकाळी रिवर फ्रंटवर गार्डला बसून आवाज दिला. त्यानंतर गार्डने रेस्क्यू टीमला कळवले आणि त्यांनी तरुणाचा जीव वाचवला.रेल्वे ट्रॅकवरुन चालणारा हा युवक पाय घसरुन नदीत पडला आणि रात्रभर तेथेच राहिला... pic.twitter.com/jAvVZr795O
— News18Lokmat (@News18lokmat) January 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.