Home /News /national /

लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला; बोलेरो-ट्रेलरच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू

लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला; बोलेरो-ट्रेलरच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू

बोलेरोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. (Bolero Accident Siddharthnagar) हा अपघात इतका भीषण होता की, तब्बल 8 जणांचा यात मृत्यू (Death in Bolero Accident) झाला.

    गोरखपूर, 22 मे : सिद्धार्थनगर जोगिया ठाणे (Siddharthnagar Jogiya Station) परिसरातील कटया गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला वऱ्हाडींनी भरलेल्या बोलेरोने जोरदार धडक दिली. (Bolero Accident Siddharthnagar) शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ही बोलेरो बांसी कोतवाली (Bansi Area) क्षेत्राच्या महुवआ गावातील एका लग्नातून परतत होते. हे वऱ्हाड शोहरातगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महला गावातील होते. लग्नानंतर ते शनिवारी रात्रीच्या सुमारास परतत होते. यावेळी गाडीत चालकासह 11 जण होते. जोगिया ठाणे परिसरातील कटया गावाजवळ पोहोचल्यावर बोलेरोने ट्रेलरला जोरदार धडक दिली.  (Bolero Accident Siddharthnagar) हा अपघात इतका भीषण होता की, तब्बल 8 जणांचा यात मृत्यू (Death in Bolero Accident) झाला. गंगा गौड नावाच्या व्यक्तिच्या मुलाच्या लग्नाहून हे सर्वजण परतत होते. मात्र, रस्त्यातच भीषण अपघात झाला. घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांनी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू -  गोरख प्रसाद नावाचा व्यक्ती ही बोलेरो चालवित होता. सकाळी गोरखपूरला जाण्यासाठी गाडी बुक होती. यामुळे त्याला गाडी घेऊन लवकर परतायचे होते. मात्र, रस्त्यातच त्याला डुलकी लागली आणि बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. बोलरोच्या या अपघातात, महला गावातील रहिवासी सचिन पाल (वय 10), मुकेश पाल (वय 35), लाला पासवान (वय 26), शिवसागर यादव (वय 18), रवी पासवान (वय 19), पिंटू गुप्त (वय 25) आणि खमरिया गावातील रहिवासी असलेल्या गौरव मौर्य यांचा मृत्यू झालेला आहे. हे झाले जखमी -  तर राम भरत पासवान (वय 48), सुरेश पन्नूलाल पासवान (वय 40), विक्की पासवान (वय 18), शुभम कल्लू गौड (वय 20) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. राम भरत आणि सुरेश पासवान यांची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. याठिकाणी उपचारादरम्यान, रामभरत याचा मृत्यू झाला. तर विक्की आणि शुभम यांच्यावर सिद्धार्धनगर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Major accident, Uttar pradesh

    पुढील बातम्या