मथुरा 17 जुलै: भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरा नगरपालिकेच्या बैठकीत आज चांगलाच राडा झाला. ही सभा सुरु असतांनाच आयुक्त आपल्या प्रश्नांची दखल घेत नसल्याचं दिसल्याने भाजपच्या नगसेविका दीपिका रानी सिंह यांचा पारा चांगलाच चढला. राग अनावर झाल्याने त्यांनी आयुक्त रविंद्र कुमार यांना चप्पल मारली. या भांडणात कुमार यांचा पीएमध्ये आला. त्या चपलेचा प्रसाद त्यालाच पडला. या घटनेनंतर बोलतांना सिंह म्हणाल्या बैठकीत मी शहराचे प्रश्न मांडत होते. मात्र त्याची दखल न घेता आयुक्तांनीच मला बसायला सांगितलं. त्याचा मला राग आला. त्यामुळे लोकांच्या प्रश्नावर राग अनावर झाल्याने मी हे कृत्य केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस झाला असून लोक त्यावर टीका करत आहेत. नगरसेविका आणि आयुक्त वाद असल्यास तो सामोपचाराने सोडवायला पाहिजे भर सभेत नगरसेविकेने चप्पल मारणं हे कुठल्या संस्कृतीत बसते असा सवाल काही लोकांनी केला आहे.
#WATCH यूपी:मथुरा नगर निगम की बैठक मेंBJPपार्षद दीपिका रानी सिंह ने नगर आयुक्त रविंद्र कुमार को चप्पल मारी। वीडियो में बचाव करने आए नगर आयुक्त के PAको चप्पल पड़ी।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 17, 2020
पार्षद ने बताया,"नगर आयुक्त को इलाके की परेशानियां बता रही थीं,उन्होंने मेरा हाथ झटका कहा चल बैठ!मुझे गुस्सा आ गया।" pic.twitter.com/ZwOFBun8u4
या नगसेविकेने सुरुवातीला महापौरांकडे आपलं गाऱ्हाने मांडलं होतं. पण त्यांनी ते ऐकून घेतलं नाही. नंतर त्यांनी आपल्या मोर्चा आयुक्तांकडे वळवला. त्यानंतर हा वाद झाला.

)







