Home /News /national /

YOGA DAY - रणरणत्या उन्हात भाजप खासदाराची अग्निसाधना; 4 महिन्यात घटवलं 25 किलो वजन

YOGA DAY - रणरणत्या उन्हात भाजप खासदाराची अग्निसाधना; 4 महिन्यात घटवलं 25 किलो वजन

ऋषीमुनी, साधूसंत अग्निसाधना करत असत.

    जयपूर, 21 जून : आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (interntaionl yoga day) सोशल मीडियावर तुम्ही योगाचे अनेक फोटो, व्हिडीओज पाहिले असतील. मात्र या भाजप खासदाराने केलेली अग्निसाधना पाहिलीत का? राजस्थानमधील भाजप खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया (Sukhbir Singh Jaunapuria) यांनी योगा दिनी रणरणत्या उन्हात अग्निसाधना केली आहे. भीषण उन्हात आपल्या चारही बाजूने अग्नी पेटवून ऋषीमुनी, साधूसंत अशी अग्निसाधना करत असत. तशीच अग्निसाधना टोंकच्या सवाई माधोपूरचे भाजप खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी केली. अग्निसाधनेसह त्यांनी मड बाथ, शंखनादही केला आणि जनतेला 'जो फिट आहे तोच हिट आहे', असा संदेश दिला. हे वाचा - international yoga day : अंग गोठवणाऱ्या थंडीत जवानांची योगासनं, पाहा PHOTOS सुखबीर सिंह हे आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत. ते स्वत: फिट राहण्यासाठी शक्य ते सर्व करतातच मात्र इतरांनाही फिटनेस मंत्रा देतात.  सुखबीर सिंह  दररोज तीन ते चार तास आपला वेळ योगा, जिम आणि साधना करण्यास देतात. सायकलिंग करतात, व्यायाम करतात. यामुळे गेल्या चार महिन्यांत त्यांनी 25 किलो वजन कमी केलं आहे. देशाच्या भावी पिढीनेही कमीत कमी एक ते दोन तास आपल्या आरोग्यासाठी काढावा, योगा आणि व्यायामा करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी योगा करा यंदाचा आंतरारष्ट्रीय योग दिन डिजीटल साजरा होतो आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम कसा महत्त्वाचा आहे हे सांगितलं. योग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे प्रत्येकानं दिवसातला काही वेळ योग आणि प्राणायाम करायला हवा. योग आणि प्राणायाम करून आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो असंही मोदी म्हणाले आहे. हे वाचा - YOGA DAY 2020 - इथं प्रत्यक्ष प्राण्यांसह केला जातो योगा; VIDEO पाहा संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: BJP MP, Health, International Yoga Day, World yoga day

    पुढील बातम्या