मराठी बातम्या /बातम्या /देश /

लखीमपूरच्या घटनेची हरियाणात पुनरावृत्ती? भाजप खासदाराच्या वाहनाने शेतकऱ्याला धडक दिल्याचा आरोप

लखीमपूरच्या घटनेची हरियाणात पुनरावृत्ती? भाजप खासदाराच्या वाहनाने शेतकऱ्याला धडक दिल्याचा आरोप

सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भवनप्रीत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक मारण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भवनप्रीत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक मारण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भवनप्रीत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक मारण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांविरोधातील हिंसाचार सुरूच आहे. दरम्यान, हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील नारायणगढमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रातील भाजपचे खासदार (BJP MP From Kurukshetra) नायबसिंग सैनी यांच्या काफिल्याने एक शेतकरी भवनप्रीत यांना धडक दिल्याची माहिती आहे. हा शेतकरी घटनेवेळी रस्त्यावर काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करत होता. वाहनाची धडक बसल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात (another Farmer Hit case) उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनेक शेतकरी (Farmer Protest) घटनास्थळी जमू लागले. सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. भवनप्रीत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक मारण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यावर खासदार नायब सैनी म्हणाले की, आम्ही एका कार्यक्रमातून बाहेर पडत होतो. या दरम्यान आमची कार मागे राहिली आणि शेतकऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. गर्दीतील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या चालकाचा गळा पकडला, माझ्यावरही हल्ला झाला. त्यावेळी कोणीतरी ओरडले की, ही खासदाराची गाडी आहे. मागे जा आणि मागून हल्ला करा. जेव्हा शेतकऱ्यांनी जबरदस्तीने गाडीखाली येण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मागच्या दारातून खाली उतरून त्यांना दूर केले. कोणत्याही शेतकऱ्याला आमच्या गाडीमुळे दुखापत झालेली नाही. शेतकरी म्हणवणारे हे लोक प्रत्येक आंदोलनाचे व्हिडिओ बनवतात. यासाठी त्यांनी हा देखील एक व्हिडिओही तयार केला असावा. त्यांनी याचा व्हिडिओ प्रसारित करावा म्हणजे 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल असे त्यांनी सांगितले. खासदारांच्या नावे नोंदणीकृत वाहन खासदार नायबसिंह सैनी नारायणगढ येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच शेतकरी निषेध करण्यासाठी पोहोचले. असे म्हटले जात आहे की कार्यक्रमानंतर, जेव्हा सैनी आपल्या ताफ्यासह निघाले, तेव्हा भवनप्रीत हा शेतकरी अचानक रस्त्यावर आला. त्यानंतर खासदारांच्या ताफ्याची गाडी त्यांना धडकली. शेतकरी नेत्यांचा दावा आहे की, भवनप्रीतला धडक देणारी इनोव्हा कार (HR 04 F0976) खासदार नायबसिंग सैनी यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. हे वाचा - शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपला धक्का; दिवंगत खा. मोहन देलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश शेतकऱ्यांची खासदार आणि चालकाविरोधात तक्रार घटनेनंतर शेतकऱ्यांनी चालक राजीव याच्या विरोधात नारायणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भारतीय किसान युनियन चधुनी गटाने तक्रारीत म्हटले आहे की, शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करत होते. त्याचवेळी खासदारांचे चालक राजीव यांनी इनोव्हा वाहन HR04F0976 वेगाने शेतकऱ्यांच्या दिशेने नेले. हे वाहन केवळ खासदारांच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे वाचा - संतापजनक! जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण; महाराष्ट्राला हादरवणारी घटना शेतकऱ्यांनी पोलिसांना 10 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याचे घेराव घालण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.
First published:

Tags: BJP, Farmer protest, Farmers protest

पुढील बातम्या