नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे वृत्त लोकांना कळताच भाजपच्या कार्यकत्यांनी शहा यांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करीत आहे. जम्मू आणि काश्मिरचे भारतीय जनता पक्षाचे नेते गुफ्तार अहमद यांनीदेखील अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्धार केला आहे. शहा यांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण रोजा ठेवणार असल्याचे गुफ्तार अहमद यांनी सांगितले.
BJP leader from Kupwara kashmir planning fast until home minister amit shah tests negative. #AmitShah #COVID19 #Kashmir pic.twitter.com/cR95gcnZxZ
— Guftar Ahmed (@GuftarAhmedCh) August 3, 2020
गुफ्तार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मंगळवारपासून आपण दररोज रोजा ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अमित शहांना लवकर बरे वाटावे यासाठी आपण अल्लाहतालाकडे प्रार्थना करू असेही त्यांनी म्हटले आहे. गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी काल ट्विट करुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन आणि चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. काल अमित शहा यांनी ट्विट करुन आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यापूर्वी ते एका बेविनारमध्ये सहभागी झाले होते. त्याशिवाय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उपस्थिती लावली होती. त्यामुळे शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे.

)







