जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'पाकिस्तानी हो क्या?' भाजपची TikTok स्टार घोषणा न देणाऱ्यांवर भडकली

'पाकिस्तानी हो क्या?' भाजपची TikTok स्टार घोषणा न देणाऱ्यांवर भडकली

'पाकिस्तानी हो क्या?' भाजपची TikTok स्टार घोषणा न देणाऱ्यांवर भडकली

भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या TikTok स्टार तिच्या घोषणांना लोकांनी प्रतिसाद न दिल्याने चिडली. घोषणा न देणाऱ्यांना तिने तुम्ही पाकिस्तानचे आहात काय असा प्रश्न विचारला.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदिगड, 08 ऑक्टोबर : भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत टिकटॉक स्टार अशी ओळख असलेल्या सोनाली फोगटला उमेदवारी दिली आहे. सध्या या टिकटॉक स्टारचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, मंगळवारी प्रचारावेळी भारत माता की जय न म्हणणाऱे पाकिस्तानचे आहेत असं टिकटॉक स्टारनं म्हटलं आहे. भारत माता की जय न म्हणणाऱ्यांची लाज वाटते असंही सोनाली फोगटने म्हटलं. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून घोषणा देताना लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यानं सोनाली फोगट नाराज झाली. त्यानंतर घोषणा न देणाऱ्याना थेट पाकिस्तानी असल्याचं म्हटलं. लोकांना आवाहन करताना सोनालीने म्हटलं होतं की, तुम्ही माझ्यासोबत भारत माता की जय म्हणाल. लोकांनी भारत माता की जय म्हटलं पण त्यात लोकांची संख्या कमीच होती. त्यावरून भडकलेल्या सोनालीने लोकांना प्रश्न विचारला की, तुम्ही पाकिस्तानमधून आला आहात का? तुम्ही भारतीय असाल तर भारत माता की जय म्हणाल. त्यानंतर पुन्हा तीने दोन वेळा भारत माता की जय म्हटलं. तरीही लोकांनी प्रतिसाद न दिल्यानं ती म्हणाली की, मला लाज वाटते की तुमच्यासारखे लोक भारतात राहतात. भाजपकडून सोनाली निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई आणि इंडियन नॅशनल लोकदलाकडून राजेश गोदरा हे निवडणूक लढणार आहेत.सोनालीचे पती संजय फोगट भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने भाजपमध्ये प्रवेश केला. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने शेवटच्या यादीत 12 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये सोनालीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध काँग्रेसकडून लढणाऱ्या कुलदीप यांनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणूक लढली होती. युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात