जाहिरात
मराठी बातम्या / देश / इंजिनियर निघाला कुबेर! नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO

इंजिनियर निघाला कुबेर! नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO

इंजिनियर निघाला कुबेर! नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO

भारतात अजय देवगणचा पुन्हा एकदा रेड सिनेमासारखा सीन पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला मात्र त्या काही संपेना अशी अवस्था झाली होती.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

पटना: भारतात अजय देवगणचा पुन्हा एकदा रेड सिनेमासारखा सीन पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला मात्र त्या काही संपेना अशी अवस्था झाली होती. एका इंजिनियरच्या घरात लाखोंचं घबाड सापडलं आहे. अधिकारी नोटा मोजून दमल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पाटणा इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांची मोजणी सुरू आहे.

जाहिरात

जमिनीची कागदपत्रे आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.सकाळी साडेदहा वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. याशिवाय किशनगंजमध्येही छापे टाकण्यात आले. ही रक्कम साधारण १ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. याशिवाय बँकेतील व्यवहारांची देखील चौकशी केली जात आहे. एकूण इंजिनियरकडून किती रक्कम सापडली याबाबत अधिकृत आकडेवारी येत बाकी आहे. संजय राय यांच्याकडे अवैध संपत्ती असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर ही छापेमारी करण्यात आली. या धाडसत्रामध्ये इंजिनियरच्या संपर्कात असलेल्या लोकांची देखील चौकशी आणि त्यांच्या घराची झडती घेण्याचं काम सुरू आहे. अजूनही छापेमारी सुरू असून अवैध रक्कम किंवा दागिने मिळतात का? हे अधिकारी तपासत आहेत. सकाळी 10:30 वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. पाटणा आणि किशनगंजमध्येही छापे टाकण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , raid
  • First Published :
जाहिरात
जाहिरात