पाटणा, 23 मार्च: बिहारमध्ये मंगळवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Bihar vidhan sabha budget session live ) 20 व्या दिवशी लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विधिमंडळात (Bihar news) पोलीस अधिनियम बिल 2021 मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घातला आहे. अधिवेशनाचं कामकाज 4 वेळा तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी (Opposition MLA) विधानसभेचे अध्यक्ष (Assembly Speaker) विजय सिन्हा (Vijay sinha) यांना त्यांच्या चेंबरमध्येच ओलीस (Hostage) ठेवलं. त्याचबरोबर DM आणि SSP यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरजवळ विरोधी पक्षाच्या आमदारांनी पोलिसांशीही हुज्जत घातली आहे.
यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांना सुरक्षा कर्मचार्यांनी एक-एक करून बाहेर ओढून काढलं. ज्यामध्ये राजदचं आमदार सतीशकुमार दास बेशुद्ध झाले आहेत. विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा गदारोळ झाला आहे. राजद आणि काँग्रेसच्या सात महिला आमदारांनी अध्यक्षांच्या खुर्ची भोवती घेरा घातला आहे. अनेकदा घंटी वाजवल्यानंतरही या महिला आमदार मागे हटण्यास तयार नाहीत. यानंतर विधानसभेतील कार्यवाही सुरू केल्यानंतर डॉ. प्रेमकुमार सभापती झाले.
यानंतरही विरोधी पक्षाच्या 12- 13 आमदारांनी पुढे येवून संबंधित बिल फाडलं आहे. यामुळे पुन्हा एकदा 5.30 वाजेपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा सध्या त्यांच्या चेंबरमध्येच बसले असून त्यांच्या चेंबर बाहेर मोठ्या संख्येनं सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे. विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे आज चार वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं, त्यामुळे आजचा सर्व वेळ वाया गेला आहे.
हे ही वाचा-मोठी बातमी : जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी उडवली; 3 शहीद, 8 जखमी
कार्यवाहीच्या दरम्यान विरोधी पक्षातील आमदार अनेकदा अध्यक्षाच्या समोरील मोकळ्या जागेत आले. तिथेही त्यांनी गोंधळ घातला. त्याचबरोबर विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणाबाजी करत संबंधित नवीन विधेयकाची कॉपीही फाडली. एवढंच नव्हे तर, रिपोर्टर टेबलवर चढले आणि टेबलही तोडून टाकला. त्याचबरोबर दुसऱ्यांदा कामकाज तहकूब केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील सर्व आमदार सदनाच्या बाहेर गेले असता राजदचे आमदार भाई विरेंद्र यांनी टेबलावर चढून विधेयकाच्या विरोधात मतदान घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.