जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान मोदींनंतर पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! खिडकीवर फेकला झेंडा अन्..

पंतप्रधान मोदींनंतर पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! खिडकीवर फेकला झेंडा अन्..

पंतप्रधान मोदींनंतर पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक! खिडकीवर फेकला झेंडा अन्..

Rahul Gandhi security in Punjab: व्हिडीओमध्ये एका व्यक्ती राहुल गांधी यांच्या खिडकीवर खूप जवळून ध्वज फेकताना दिसत आहे. गांधी कारच्या समोरच्या सीटवर बसले होते आणि समर्थकांना अभिवादन करण्यासाठी त्यांची खिडकी उघडी होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

लुधियाना, 7 फेब्रुवारी : पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. लुधियानामध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कारवर झेंडा फेकण्यात आला, ज्यात त्यांच्या चेहऱ्याला मार लागला. या घटनेने राहुल गांधी यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राहुल गांधी ज्या कारमध्ये बसले होते, ती गाडी पंजाब काँग्रेसचे प्रभारी सुनील जाखड चालवत होते, तर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि राज्य पक्षाचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू मागच्या सीटवर बसले होते. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने अगदी जवळून राहुल गांधींच्या खिडकीवर झेंडा फेकताना दिसत आहे. राहुल गांधी कारच्या समोरच्या सीटवर बसले होते आणि समर्थकांना अभिवादन करण्यासाठी त्यांची खिडकी उघडी होती. सुरक्षेत त्रुटी राहण्याचा पंजाबमधील हा दुसरा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यालाही राज्यात सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला होता. जेव्हा त्यांची कार उड्डाणपुलावर 20 मिनिटे अडकली होती. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी (PM Security Breach Case) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला. सरन्यायाधीश एनव्ही रमण (CJI NV Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याचे मान्य केल्याचे समोर आले आहे. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. त्याचवेळी, चंदीगडचे डीजीपी, एनआयएचे आयजी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि पंजाबचे एडीजीपी (सुरक्षा) यांचाही यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. या समितीचा अहवाल येईपर्यंत आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय राज्य व केंद्र सरकारने स्थापन केलेली समिती कोणतीही कारवाई करणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात