Home /News /national /

काय आहे भाजपच्या संकल्पपत्रात? दिल्ली-मुंबईकरांसाठी मोठी बातमी

काय आहे भाजपच्या संकल्पपत्रात? दिल्ली-मुंबईकरांसाठी मोठी बातमी

दिल्ली-मुंबईकरांसाठी आयोजित केलेल्या या योजनेसाठी तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे

    नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारतीय जनता पक्षाने (BJP) शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2020) पार्श्वभूमीवर पक्षाचा संकल्प पत्र सादर केला आहे. संकल्पपत्र सादर करताना पक्षाचे दिल्लीचे सर्व सात खासदार आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. संकल्प पत्र जारी करताना भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की, या घोषणापत्रातून भाजपने दिल्लीच्या सुधारणेचा संकल्प केला आहे. दिल्लीत भाजप सरकार आल्यानंतर या शहराची वायू व जल प्रदूषणातून सुटका करण्यात येईल. याशिवाय दिल्लीकरांना सोयीसुविधा मिळण्यासाठी पार्टी काम करणार आहे. मनोज तिवारी यांनी आरोप केला आहे की, दिल्ली सरकारने केंद्राच्या योजना लागू केल्या नाहीत. तिवारींनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आप सरकारने सर्वसामान्यांना दिलेले वचन पूर्ण केले नसल्याचा आरोप लावला आहे. यावेळी तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई हायवेचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 3 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, तीन वर्षांच्या आत केवळ 12 तासांत दिल्लीकर आपली गाडी घेऊन मुंबईला पोहोचतील. गडकरी पुढे असे म्हणाले की, दिल्ली मेरठच्या दरम्यान 16 लेनच्या रस्त्याचे एप्रिल महिन्यात उद्घाटन करण्यात येणार आहे. या 90 किमी रस्त्याच्या निर्माणासाठी 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्यामुळे दिल्ली ते मेरठ हा रस्ता केवळ 40 ते 45 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात येईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे पक्षांकडून संकल्पपत्र सादर केले जात आहे. आता सरकार सत्तेत आले तर पुढील पाच वर्षे काय काय काम करणार याचं नियोजन सादर केलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या