जाहिरात
मराठी बातम्या / देश / लसीकरणानंतर लहान मुलांना Paracetamol आणि पेनकिलरची गरज?, भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती

लसीकरणानंतर लहान मुलांना Paracetamol आणि पेनकिलरची गरज?, भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. 1 जानेवारीपासून कोविन (CoWIN) अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी (Registration for vaccine) नोंदणी सुरु झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 जानेवारी: 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. 1 जानेवारीपासून कोविन (CoWIN) अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी (Registration for vaccine) नोंदणी सुरु झालं. या लहान मुलांच्या लसीकरणासाठी (vaccination) नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय. आता या लसीकरणासंदर्भात भारत बायोटेकनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोविड-19 ची Covaxin लस दिल्यानंतर कोणत्याही पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर औषधाची गरज नाही, असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं म्हटलं आहे की, आम्हाला लसीकरणासंदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात काही लसीकरण केंद्रावर लहान मुलांना कोवॅक्सिन लसीसोबत तीन 500 मिलीग्रॅमच्या पॅरासिटामॉल गोळ्या घेण्याची शिफारस करत आहेत. कोवॅक्सिनची लस दिल्यानंतर कोणत्याही पॅरासिटामॉल किंवा पेनकिलर औषधांची शिफारस केली जात नाही,” असे भारत बायोटेकनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं ट्विटरवर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.

जाहिरात

सुमारे 30,000 लोकांच्या क्लिनिकल चाचण्यांद्वारे, अंदाजे 10 ते 20 टक्के लोकांनी साइड इफेक्ट्स नोंदवले आहेत आणि त्यापैकी बहुतेक सौम्य होते, एक किंवा दोन दिवसात ते बरे देखील झाले. तसंच त्यांना कोणत्याही औषधाची आवश्यकता नव्हती, असं कंपनीनं म्हटलं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधाची शिफारस केली जाते, असंही भारत बायोटेकनं म्हटलं आहे. पॅरासिटामॉलची शिफारस इतर कोविड-19 लसींसोबतच करण्यात आली होती आणि ती कोवॅक्सिनसाठी दिली जात नाही, असंही कंपनीनं सांगितलं आहे. अशी करा नोंदणी पहिलं Covin App वर जा. तुमचा मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा. नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा. तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा. सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल. या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जवळपास 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण दिलं आहे. तसंच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात