बेंगळुरू, 5 डिसेंबर : देशातली प्रतिष्ठित शिक्षण संस्था असणाऱ्या बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. एका प्रयोगशाळेत काही काम सुरू असताना हायड्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय आणि तिघे जखमी झाल्याची माहिती आहे. IISc च्या एरोस्पेस कँपसमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं. या स्फोटात मनोज कुमार हे ३२ वर्षीय संशोधक जागीच ठार झाले. मनोज कुमार म्हैसूरचे राहणारे होते. याशिवाय कार्तिक, नरेश कुमार आणि अदुल्य उदय कुमार अशा इतर शास्त्रज्ञांनाही गंभीर इजा झाली आहे. सुपर वेव्ह टेक्नॉलॉजी या स्टार्टअपबरोबर IISc चा एक प्रकल्प सुरू होता. त्यासाठी काही तरुण शास्त्रज्ञ कँपसमध्ये प्रयोग करत होते. अधिक वृत्त आल्यावर ही बातमी अपडेट करण्यात येईल. VIDEO : बायको परत आल्याशिवाय खाली उतरणार नाही; नवरोबाचा हायव्होल्टेज ड्रामा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.