जाहिरात
मराठी बातम्या / देश / राहुल गांधींची सभा सुरू असताना बाजूलाच वाटली जात होती बिअर

राहुल गांधींची सभा सुरू असताना बाजूलाच वाटली जात होती बिअर

राहुल गांधींची सभा सुरू असताना बाजूलाच वाटली जात होती बिअर

बिअरचे बॉक्स दिसले खरे पण पोलीस म्हणतात, अाम्ही पोहचलो तेव्हा कोणी नव्हतं. नेते म्हणतात, आम्ही खाद्यपदार्थ दिले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    भोपाळ, 9 फेब्रुवारी : देशात सर्वच पक्ष आगामी लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत तीन राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. आता भाजप, काँग्रेससह इतर पक्षही रॅली काढत आहेत. पक्षाच्या रॅलीत, कार्यक्रमात कार्यकर्त्याची गर्दी जमवण्यासाठी अनेक कल्पना लढवल्या जातात. काँग्रेसने वापरलेला फंडा मात्र अजबच होता. तसा तो पडद्यामागे वापरला जाणारा फंडा, पण मध्यप्रदेशात उघडपणे वापरला गेला. भोपाळमधील जंबूरी मैदानावर ८ फेब्रुवारीला काँग्रेसने आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. कार्यक्रमा स्थळापासून काही अंतरावर जिल्हा काँग्रेस कमिटीने एक तंबू उभा केला होता. याठिकाणी येणाऱ्या बसमधील लोकांना थांबवून बिअर वाटली जात होती. या बसेस कार्यक्रमासाठीच येत होत्या. ज्या भागात काँग्रेसचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होता. तिथल्या लोकांनी याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस त्या ठिकाणी पोहचले मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना तिथून घालवलं. त्यानंतर बिअर वाटण्याचा हा कार्यक्रम सकाळी 11 पासून 1 वाजेपर्यंत सुरू होता. बिअरच्या बाटल्या वाटण्यासाठी एका माणसाकडे यासाठी खास कूपन दिल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर पोलिसांनी म्हटलं आहे की, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथून तंबू काढण्यात आला होता. सिवनीतील काँग्रेस नेता राजकुमार खुराना यांनी मात्र बिअरच्या बाटल्या नव्हत्या तर त्या ट्रेमध्ये खाद्यपदार्थ होते असं म्हटलं आहे. जर तिथे काही सापडलं असेल तर कोणीतरी गडबड केली असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. =============

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात