श्योपुर, 21 जुलै: लग्नाला एक दिवस बाकी असताना, नवरदेव मुलानं आपल्या होणाऱ्या बायकोच्या प्रियकराला गोळी मारल्याची घटना समोर आली आहे. नवरदेव मुलानं होणाऱ्या बायकोचा पिच्छा सोड म्हणत, प्रियकराला दमदाटी केली. पण नवरी मुलगी आपल्यावर प्रेम करते आणि तू तिच्याशी जबरदस्तीनं विवाह करत असल्याचा दावा प्रियकरानं केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणानं आपल्या प्रियकाराला गोळी मारली आहे. यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशी त्याच मुलीशी विवाह केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशातील श्योपुरनजीक असणाऱ्या पांडोला गावातील आहे. या गावातील रहिवासी असणाऱ्या पवन नावाच्या तरुणाचा गावातील एका तरुणीसोबत विवाह ठरला होता. पण लग्न ठरलेल्या मुलीचं कुलवीर ऊर्फ जसवीर नावाच्या 23 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसीचं लग्न ठरलं असूनही प्रियकर तिचा पिच्छा करत होता. याची माहिती नवरदेव पवनला मिळाली.
हेही वाचा-दारुच्या आहारी गेलेल्या आईची लेकाकडून हत्या, वसईतला संतापजनक प्रकार
त्यामुळे त्यानं होणाऱ्या बायकोच्या प्रियकराला भेटायला बोलवलं. यानंतर पवननं कुलवीरला आपल्या होणाऱ्या बायकोचा पिच्छा सोडायची विनंती केली. तसेच मंगळवारी आपलं लग्न होणार आहे. लग्नात बाधा ठरू नको, असं सांगतिलं पण संबंधित मुलगी आपल्या प्रेम करते. तू तिच्याशी जबरदस्तीनं विवाह करत असल्याचं कुलवीरने सांगितलं. यामुळे संतापलेल्या नवरदेव मुलानं होणाऱ्या बायकोच्या प्रियकरावर गोळी झाडली. या घटनेत प्रियकराच्या कंबरेत गोळी आरपार गेली आहे.
हेही वाचा-लग्नाच्या 3 महिन्यानंतर पतीचं खरं रुप समोर, कारसाठी पैसे न आणल्यानं पाजलं अॅसिड
याप्रकरणी पीडित तरुणानं नवरदेव पवनसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून लग्न झाल्यानंतर, कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित पीडित तरुण हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्याविरोधात काही गुन्हेही दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. जखमी तरुणावर मारहाणीसोबतच छेडछाड केल्याचे गुन्हे दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास पांडोला पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gun firing, Madhya pradesh, Marriage