राजस्थान, 19 जून : पाच दिवसांपासून राजस्थानमध्ये वादळी स्थिती असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात तर विज, पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. बरं इतकंच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे रेल्वे ट्रॅक आणि रस्ते वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे वाळवंटी भागात अन्नसाठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उंटांचा वापर केला जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, वाळवंटातील वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळ-जवळ 2000 गावांचा सपंर्क तुटल्याचं सांगण्यात आलं आहे. रस्त्यावर वाहने चालवणं अवघड झालं आहे.
भारत-पाकिस्तानला जोडणाऱ्या थार एक्सप्रेसच्या रुळावर रेती साचल्यामुळे रेल्वे रूळ बंद करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.