पीयूष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 27 जुलै : देशात सध्या सीमा हैदर-सचिन मीणा, अंजू-नसरुल्लाह यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात होत आहेत. यातच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. भारतातील एका तरुणाचे बांग्लादेशमधील एका तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. आता ही तरुणी आपल्या प्रियकराला विना पासपोर्ट बांग्लादेशला घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुरादाबादमधील सुनीता नावाच्या एका महिलेने बांग्लादेशी बांग्लादेशातील आपली सून जुली उर्फ जूहीविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी त्यांनी एक पत्र मुरादाबादचे एसएसपी यांना दिले होते. त्यांनी आरोप केला आहे की, तिची सून जुही उर्फ ज्युली ही तिचा मुलगा अजय सैनीला पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय बांगलादेशला घेऊन गेली आहे. या तक्रारीनंतर आता मुरादाबादमध्ये खळबळ उडाली. पोलीस आणि तपास यंत्रणांच्या प्रदीर्घ तपासानंतर आता अजय आणि जुलीची ही कहाणी जवळपास संपली आहे.
अजय हा ट्रक ड्रायव्हर होता. 2017 मध्ये अजयची फेसबुकवर जूही उर्फ ज्युलीशी नावाच्या एका तरुणीशी मैत्री झाली. जूही ही बांगलादेशची राजधानी ढाका येथील गाझीपूर येथील रहिवासी आहे. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ज्यूली ही विवाहित होती तरी ती अजयसोबत लग्नाचे स्वप्न पाहू लागली. तर अजय सैनी देखील तिच्या चांगलाच प्रेमात पडला होता. तोही तिच्यासोसोबत सेटल होण्याचे स्वप्न पाहू लागला होता. जुहीने अजयला सांगितले होते की, तिचे लग्न झाले आहे. पतीच्या निधनानंतर ती आणि तिची 11 वर्षांची मुलगी हलिमा एकत्र राहतात. तसेच भाड्याच्या घराच्या पैशातून त्यांचा घरखर्च चालतो.
तर अजयला सुद्धा तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, तो हिंदू आणि जूही मुस्लिम होती. त्यामुळे जुहीने त्याला सांगितले की, ती भारतात येईल आणि हिंदू धर्म स्वीकारुन त्याच्याशी लग्न करेल. 2022 मध्ये जूही उर्फ जूली भारत आली आणि तिने जून महिन्यात धर्मांतरण करुन अजय सैनीसोबत एका मंदिरात लग्न केले. मात्र, अजयने एका बांग्लादेशी तरुणीसोबत लग्न केल्यानंतर अजयची आई प्रचंड संतापली. मात्र, अजय सैनीने आईला सांगितले की, सर्व काही ठीक होऊन जाईल. दरम्यान, यानंतर अजय आपली पत्नी ज्यूलीला आईजवळ सोडून कर्नाटकात नोकरीसाठी निघून गेला. मात्र, इकडे अजयची पत्नी आणि अजयची आई या दोघांमध्ये वाद झाले. त्यामुळे रागाच्या भरात दुसऱ्या दिवशी जूली बांग्लादेश निघून गेली. काही दिवस अजय सैनीने आपल्या पत्नीला परत येण्यासाठी विनंती केली. मात्र, जूली भारतात परत नाही आली. यानंतर 11 महिन्यांनंतर अजय कर्नाटकातून मुरादाबाद येथे परत आला आणि आईने जुलीला कॉल करण्यासाठी समजावू लागला. मात्र, अजयची आई सुनीता हिने तु जूलीसोबत कुठेही राहा, असे सांगितले. मात्र, ती त्याला घरी ठेवणार नाही. मात्र, यादरम्यान, अजय मुरादाबाद येथे परत आल्याची माहिती मिळाल्यावर जूलीही परत आली आणि मुरादाबाद येथे पोहोचली. काही दिवस सोबत राहिल्यानंतर जूही तिची मुलगी हलीमा आणि अजय सैनी व्हिसाची मुदत वाढवण्याचे कारण देऊन कोलकाता येथे गेली. मात्र, तिथे गेल्यावर जुलीने बांग्लादेशात आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरुमध्ये काही वाद झाल्याचे सांगून पुन्हा बांग्लादेशला चालली गेली. यादरम्यान, अजय सैनी तिथेच बांग्लादेशच्या सीमेवर 3500 रुपये महिन्याच्या भाड्याच्या घरात राहू लागला आणि ऑटो रिक्शा चालवू लागला. अजयजवळ त्याची पत्नी जूलीचे बांग्लादेशी मोबाईल नेटवर्क कंपनीचे सीमकार्ड होते. यामध्ये सीमेवर पोहोचल्यावर, बांगलादेशच्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे अजय सैनीच्या मोबाइलमधील बांगलादेशी सिमकार्ड काम करू लागले. दरम्यान, बांगलादेशच्या सीमेवर संततधार पावसात अजय पडला आणि जखमी झाला आणि डोक्याला मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. अजयने तो फोटो काढून आईला पाठवला आणि त्याने तो फोटो बहिणीलाही पाठवला आणि तिला काही पैसे उसने मागितले. यानंतर अजयच्या आईने त्याला कॉल केला, मात्र, तो बांगलादेशात आहे आणि आता येऊ शकत नाही, असे त्याने सांगितले. दरम्यान, आपल्या मुलाचा जखमी अवस्थेतील तो फोटो पाहून सुनीता सैनी यांनी एसएसपी मुरादाबाद हेमराज मीना यांच्याकडे जूलीची तक्रार केली. त्यानंतर एसएसपींनी हे प्रकरण गांभीर्याने घेत हा तपास एलआययूकडे सोपवला. तसेच पासपोर्ट व्हिसाशिवाय भारतीय नागरिक बांगलादेशात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इतर तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. आता तपासाअंती अजय हा भारत आणि बांगलादेशच्या सीमेजवळील भारतीय सीमेवर भाड्याच्या घरात राहात असल्याचे निष्पन्न झाले.