वाराणसी (उत्तरप्रदेश), 12 एप्रिल : उत्तर प्रदेश राज्यातील 27 विधानपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल समोर आला आहे. (UP MLC Election 2022) विधानपरिषदेच्या एकूण 36 जागांपैकी 9 जागांवर भाजपने आधीच विजय मिळवला होता. यांतर उरलेल्या 27 जागांपैकी 24 जागांवर भाजपने आणखी दणदणीत विजय मिळवला आहे. तर 3 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. तर तेच दुसरीकडे माफिया आणि विधान परिषेदेचे आमदार ब्रिजेश सिंह (Bahubali Brijesh Singh) यांच्या पत्नी अन्नपूर्णा देवी सिंह (Annapurna Singh) निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरल्या होत्या. वाराणसी-चंदौली-भदोही यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले सुदामा पटेल यांना डिपॉझिट देखील वाचविता आले नाही.
वाराणसीमध्ये भाजपचा पराभव -
वाराणसी-चंदौली-भदोही येथील विधानपरिषदेच्या जागेवर माफिया बृजेश सिह यांच्या पत्नी आणि अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा सिंह यांनी विजय मिळवला. त्यांना 4234 मते मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार उमेश यादव यांना 345 मते आणि भाजपचे उमदेवार 170 मते मिळाली. भाजप उमेदवार डॉ. सुदामा पटेल यांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही.
वाराणसी विधानपरिषेसाठी एकूण 4979 मतदार होते. यात 4876 इतके मतदान झाले. यापैकी 127 मते रद्द करण्यात आले. यामुळे 4749 इतके मतदान झाले. यामुळे निवडणुकीत जिंकण्यासाठी 2375 इतक्या मतांची आवश्यकता होती. भाजप उमेदवाराला फक्त 170 मते मिळवता आली. तर अन्नपूर्णा सिंह यांना 4234 मते मिळाली.
उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या (एमएलसी) 27 जागांसाठी आज (12 एप्रिल) मतमोजणी होत आहे. आज मतमोजणी होत असलेल्या जागांवर 09 एप्रिल रोजी मतदान झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या एकूण 36 जागा आहेत. त्यापैकी भाजपने आधीच 9 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. पण भाजपचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघात पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - पाकच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींकडून अभिनंदन, शुभेच्छा संदेशात उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा
गेल्या दोन दशकांपासून विधानपरिषदेची जागा माफिया ब्रिजेश सिंहच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. 2016 च्या एमएलसी निवडणुकीत अपक्ष ब्रिजेश सिंह यांनी शेवटच्या वेळी रिंगणात उतरवले होते. ज्यांना भाजपने वॉकओव्हर देत आपला उमेदवार उभा केला नाही. यापूर्वी ब्रिजेश सिंह यांचा भाऊ भाजपच्या तिकिटावर दोनदा विजयी झाला आहे आणि एकदा त्यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह बसपाच्या तिकिटावर एमएलसी झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali, BJP, UP, UP Election, Uttar pradesh