जाहिरात
मराठी बातम्या / देश / ना मोबाईल आहे जवळ, ना बँकेत खाते पण रिक्षाचालकाचं नशीब चमकलं, लागली अडीच कोटींची लॉटरी

ना मोबाईल आहे जवळ, ना बँकेत खाते पण रिक्षाचालकाचं नशीब चमकलं, लागली अडीच कोटींची लॉटरी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका रिक्षाचालकाला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

रुली बिष्नोई, प्रतिनिधी नवी दिल्‍ली, 20 एप्रिल : पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील लोहगढ येथील रहिवासी असलेले देव सिंह गेल्या 40 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहेत. एक दिवस आपले नशीब उघडेल, असा त्याला विश्वास होता. या विश्वासाने ते दरवर्षी बंपर ड्रॉसाठी तिकीट खरेदी करत होते. अखेर त्यांचा विश्वास आता सार्थ ठरला आहे आणि देवाने त्यांना 40 वर्षांनी करोडपती बनवले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

रिक्षाचालक देव सिंग यांनी पंजाब राज्य लॉटरीचा 2.5 कोटी रुपयांचा बैसाखी विशेष बंपर लॉटरी जिंकली आहे. देव सिंह म्हणतात की, निसर्गावरील प्रेमामुळेच परमेश्वराने त्यांचे दिवस बदलले आहेत. विशेष बाब म्हणजे बैसाखी बंपरपूर्वी देव सिंह यांची कधीही 100 रुपयांची लॉटरी लागली नव्हती. अत्यंत गरीब असलेले देव सिंग रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देव सिंह यांनी सांगितले की, ते कमावलेले सर्व पैसे घरी खर्च करतात. त्यामुळेच त्यांनी कधी बँक खाते उघडण्याचा विचारही केला नाही. त्याच्याकडे मोबाईलही नाही. देव सिंह सांगतात की, आता ते बँक खाते उघडतील. आजवर बँक खाते न उघडण्याबाबत ते सांगतात की, रिक्षा चालवून त्यांना इतके पैसे नाही मिळत की ते कुटुंबाचा खर्च भागवल्यानंतर काही पैसे शिल्लक टाकतील. त्यामुळे जर पैसेच नाही तर बँक खाते उघडण्यात तरी काय अर्थ होता, असे ते म्हणतात. देव सिंह यांचे लोहगड परिसरात कच्चे घर आहे. चार लहान खोल्या आहेत. देव सिंह वर्षानुवर्षे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. विशेष म्हणजे देव सिंह यांना दारू किंवा इतर कोणतेही व्यसन नाही. त्यांना फक्त लॉटरी खेळायची सवय आहे. याच सवयीने आज ते करोडपती बनले आहे. देव सिंह सांगतात की, ते 40 वर्षांपासून प्रत्येक खास दिवशी लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहेत. पण त्यांना जिंकण्याची अपेक्षा नव्हती आणि आजपर्यंत त्यांनी कधीही 100 रुपयांचे बक्षीसही जिंकले नव्हते. देव सिंह यांचा फक्त मेहनतीवर विश्वास आहे. ते निसर्ग आणि प्राणीप्रेमी आहे. तहानलेला प्राणी दिसल्यास त्यांना पिण्यासाठी ते पाणी देतात. एखादे झाड सुकत असेल तर त्याला ते पाणी घालतात. ही सवय त्यांना लहानपणापासून आहे. त्यांच्या या सेवेमुळेच ते आज या पुरस्काराचे पात्र ठरले आहेत, असे देव सिंह सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lottery , money , Punjab
  • First Published :
जाहिरात
जाहिरात