मराठी बातम्या /बातम्या /देश /Video : पोलिसांकडून चोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग अन् रस्त्यावर नोटांचा पाऊस

Video : पोलिसांकडून चोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग अन् रस्त्यावर नोटांचा पाऊस

तेलंगणातल्या जगत्याल जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाखो रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडताना दिसत आहेत.

तेलंगणातल्या जगत्याल जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाखो रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडताना दिसत आहेत.

तेलंगणातल्या जगत्याल जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाखो रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडताना दिसत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Hyderabad, India

    हैदराबाद, 19 जानेवारी : तेलंगणातल्या जगत्याल जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाखो रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडताना दिसत आहेत. हे प्रकरण एटीएम चोरीचं असल्याची बाब आता समोर आली आहे. या ठिकाणी चार चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून पैसे लुटले, मात्र ते घेऊन पळून जात असताना 19 लाख रुपयांच्या नोटा खाली पडल्या.

    एटीएममध्ये चोरी  

    चोरटे एटीएम मशिनमधून पैसे काढून कारमध्ये ठेवत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, गाडी रस्त्यावर उभी आहे, पण त्याच दरम्यान एक पोलीस जिप्सी भरधाव वेगाने तिथं येते. पोलिसांची जिप्सी पाहून चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर पोलीस त्यांच्या गाडीला धडक देतात. या धडकेमुळे रोखीने भरलेले तीन बॉक्स खाली पडले, तर चौथ्या बॉक्समधील पैसे बाहेर उधळले गेले असं या व्हिडिओत दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    अलार्ममुळे पोलीस सतर्क  

    पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर पळून जात होते. मात्र याचदरम्यान 19 लाखांच्या नोटा रस्त्यावर पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अलार्म वाजल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला होता. चोरट्यांचा पाठलाग करताना पोलिसांच्या पथकाने चोरट्यांच्या गाडीला धडक दिली मात्र तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही, पण चोरांजवळ असलेल्या पैशांचा बॉक्स खाली पडला. नंतर रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची धडक त्या बॉक्सला लागली आणि त्यातील नोटा रस्त्यावर पसरल्या.

    ...तर चोर पसार झाले असते  

    जगत्यालचे एसपी सिंधू शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की, जर आमची टीम 30 सेकंद उशिरा पोहोचली असती तर ते पैसे घेऊन पसार झाले असते. तसेच अलार्मबद्दल बोलताना ते म्हणाले की, एटीएममध्ये अलार्म सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी जवळच्या पोलीस स्टेशनशी लिंक करण्यात आली आहे. मशिनशी कोणत्याही प्रकारची छेडछाड झाल्यास पोलिसांना त्याबद्दल कळतं. त्याचाच फायदा या घटनेवेळी झाला. स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आणि चोरटे पळून जाण्यापूर्वीच पोलीस पोहोचले त्यामुळे ही चोरी थांबवण्यात पोलिसांना यश आलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    हेही वाचा : शाळेच्या ड्रेस कोडने घेतला जीव? मैत्रिणीशी बोलताना अचानक कोसळली अन् भयंकर घडलं!

    एसबीआयच्या एटीएममध्ये चोरी 

    मिळालेल्या माहितीनुसार, एटीएम स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे 19,00,200 रुपये चोरीला जाण्यापासून वाचले. चोरट्यांचा शोध सुरू असून ते हरियाणा किंवा उत्तर प्रदेशातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक संशयास्पदरित्या फिरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांचा शोध सध्या सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Hyderabad, Money, Robbery, Telangana, Theft