कारगिल युद्धादरम्यान वाजपेयी शरीफांसोबत फोनवर बोलत होते? पुस्तकातून मोठा खुलासा

कारगिल युद्धादरम्यान वाजपेयी शरीफांसोबत फोनवर बोलत होते? पुस्तकातून मोठा खुलासा

कारगिल युद्धाबाबतच्या घडामोडी भारतीयाच्या मनात खास स्ठान राखून आहेत. या युद्धातली आजवर माहित नसलेली एक घडामोड नुकत्याच आलेल्या एका पुस्तकातून कळते.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : कारगिल युद्ध (Kargil War) हा प्रत्येक भारतीयासाठी न विसरता येणारा घटनाक्रम आहे. या युद्धाबाबत आजवर गुप्त राहिलेली एक बाब आता एका नव्या पुस्तकातून समोर आली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात कारगिल युद्धादरम्यान फोनवर संवाद झाला होता.

The Hindu नं यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार वाजपेयी आणि शरीफ कारगिल युद्धादरम्यान एकमेकांशी चार ते पाच वेळा बोलले होते. 'वाजपेयी : द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया' या पुस्तकात शक्ती सिन्हा यांनी हा खुलासा केला असून पेंग्विन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शक्ती सिन्हा हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.

वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून सिन्हा दीर्घकाळ कार्यरत होते. शिवाय पंतप्रधान कार्यालयातही त्यांनी काम केलेलं आहे. या खुलाशामुळे 'जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानी सैन्याच्या वर्चस्वाखाली नवाज शरीफ गोंधळून गेले होते.' या आजवरच्या लोकप्रिय धारणेला शह मिळतो आहे. सोबतच पुस्तकात शरीफ आणि ओआरएफ अर्थात ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनचे माजी प्रमुख आर. के. मिश्रा यांच्या भेटीचाही वृत्तांत आहे.

पुस्तकात लिहिलंय, 'शरीफ यांच्या पदाची अवस्था तेव्हा संदिग्ध होती. आणि नंतरच्या बैठकीत त्यांनी मिश्रा यांनी म्हटलं, की आपण बाहेर बागेत वॉक घेऊ. साहजिकच त्यांचं स्वत:चं घर काहीएक बोलणी करण्यासाठी सुरक्षित नसल्याची जाणीव त्यांना होती. मिश्रा यांनी जेव्हा हे वाजपेयींनी सांगितलं, तेव्हा वाजपेयींनी याला एक सूचक गोष्ट म्हणून पाहिलं. शरीफ बाकी काही नसून सगळ्या परिस्थितीचे गुलाम आहेत ही ती गोष्ट.'

पुढं पुस्तकात लिहिलंय, 'वाजपेयी यांनी शरीफ यांना मेच्या मध्यापासून ते 4 जुलैपर्यंतच्या काळात किमान चार-पाच फोन नक्की केले असणार. तो हा काळ होता जेव्हा शरीफ यांनी अमेरिकेचे पंतप्रधान क्लिंटन यांना सांगितलं, की पाकिस्तान आपलं सैन्य एलओसीवरून मागं घेईल. यापैकी एक फोन जुनच्या मध्यात श्रीनगरहून केला गेला. वाजपेयी तेव्हा कारगिलभेटीवर गेले होते. या पुस्तकानुसार, पाकिस्तानने आपलं सैन्य मागं घेण्याचं एक कारण मेजर अरविंद दवे यांनी वाजपेयी यांना दिलेल्या कॉल रेकॉर्डींग्ज हे होतं. दवे रिसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे तत्कालिन प्रमुख होते. हे पुस्तक सामान्यांना माहित न झालेली वाजपेयी यांच्या कार्यकाळाची आतून पाहिलेली रंजक बाजू उजेडात आणतं.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading