• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE Assembly Election Results 2021 : नंदीग्राम मतदारसंघातील मतांची पुन्हा मोजणी करा- तृणमूल काँग्रेस

LIVE Assembly Election Results 2021 : नंदीग्राम मतदारसंघातील मतांची पुन्हा मोजणी करा- तृणमूल काँग्रेस

Assembly election Results 2021 Live: पश्चिम बंगालच्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखत भाजपला आस्मान दाखवले आहे.

 • News18 Lokmat
 • | May 02, 2021, 21:48 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  19:42 (IST)

  It's official! अखेर ममता नंदीग्राम हरल्याचं झालं जाहीर

  शेवटच्या क्षणाच्या चुरशीनंतर अखेर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी नंदीग्राममधून हरल्याचं जाहीर केलं. 

  भाजपच्या शुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा 1737 मतांनी पराभव केला.

  17:51 (IST)

  'ममता जिंकल्या!' 'आता कोरोनाकडे लक्ष देऊया : उद्धव ठाकरे'

  ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.

  16:35 (IST)

  ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून विजयी झाल्या आहे, त्यांनी भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी यांचा अवघ्या 1200 मतांनी पराभव केला आहे.
   

  16:30 (IST)

  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन

  14:5 (IST)

  तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण
   

  13:50 (IST)

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं ममतादीदींचं अभिनंदन

  12:48 (IST)

  पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

  12:29 (IST)

  पाच राज्यांमध्ये कुणाला किती जागा? बंगाालमध्ये ममतादीदींचा दबदबा कायम
   


  नवी दिल्ली, 2 मे: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे (Assembly election Results 2021 Live) चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पाँडेचरीत विधानसभेसाठी मतमोजणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत....