Assembly election 2021 Exit poll : पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. एग्जिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहे. यातही विविध एग्जिट पोलमध्ये परिस्थिती वेगवेगळी असल्याचं दिसत आहे. आज चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांचे एग्जिट पोल समोर आले आहे. विविध संस्थांच्या एग्जिट पोलची आकडेवारी आता समोर आली आहे.
केरळमध्ये यूडीएफ आणि एलडीएफमध्ये टक्कर
140 जागांच्या केरळ विधानसभा कार्यकाळ 1 जून रोजी संपला आहे. राज्यात 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या युतीत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने 91 जागांवर यश मिळवलं होतं. पिनराई विजयन राज्याचे 12 वे मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट दुसऱ्या नंबरवर होता. यंदा ही दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे.
आसाममध्ये काँग्रेस परतणार?
126 जागा असलेल्या आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी समाप्त होणार आहे. 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2016 च्या निवडणुकीत भाजपला 86 जागा मिळाल्या होत्या आणि सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
तामिळनाडूमध्ये डीएमकेला मिळणार सर्वाधिक जागा?
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. 234 जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेसाठी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वा एआयएडीएमकेने यश मिळवलं होतं. जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके मैदानात आहे. त्यांना यंदा डीएमकेकडून टक्कर मिळाली आहे.
पुद्दूचेरीमध्ये टक्कर
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ 8 जून रोजी संपणार आहे. 30 जागा असलेल्या पुद्दूचेरी विधानसभेसाठी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीए युतीने यश मिळवलं होतं. यूपीएला एकूण 17 जागांवर यश मिळालं होतं. ज्यात काँग्रेसला एकट्या 18 जागा मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Assam Election, Assembly Election 2021, Tamil nadu Election, West bangal