नवी दिल्ली, 2 मे: पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. (Assembly Election 2021 Results LIVE) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत दिसलेल्या कलानुसार, काही वेगळे रंग जाणवले. या आहेत पहिल्या निकालांच्या कलानुसार 6 मोठ्या घडामोडी..
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Assembly Election Result live) नंदीग्राम मतदारसंघाकडे (Nandigram Mamata Bannerjee Vs Suvendu Adhukari) देशाचं लक्ष आहे. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार टक्कर द्यायला त्यांचेच एके काळचे विश्वासू सहकारी शिवेंदु अधिकारी विरोधात उभे राहिल्याने काटें की टक्कर आहे. पहिल्या काही तासांतल्या कलानुसार शुवेंदु आघाडीवर होते. ममता बॅनर्जी पिछाडीवर होत्या.
बंगालमध्ये तृणमूल आघाडीवर
पश्चिम बंगालमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी मिळवली होती. 150 जागांवर TMC तर 83 जागांवर भाजप आघाडीवर होते.
LIVE Assembly Election Results 2021 :बंगालमध्ये TMC आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर
आसाममध्ये भाजपची मुसंडी
आसामचा (Assam Election Results 2021) गड भाजप जिंकण्याची शक्यता काही निवडणूक अंदाजातून वर्तवली होती. सुरुवातीचे मतमोजणीचे कल त्याच दृष्टीने दिसत आहेत. पहिल्या दोन तासांत आसाममध्ये भाजप आणि मित्रपक्षांनाना 70 जागांवर तर काँग्रेसला 39 जागांवर आघाडी असल्याचं दिसतं.
तामिळनाडूत DMK ची घोडदौड
तामिळनाडूत (Tamil Nadu election result 2021) एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार द्रमुकने आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन तासांत 128 जागांवर DMK आघाडीवर होते तर 97 जागांवर AIDMK ने आघाडी घेतली होती.
केरळमध्ये LDF आघाडीवर
केरळमध्ये (Kerala Election Results 2021) डाव्या आघाडीने वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन तासांत LDF 93 आणि UDF ला 45 जागांवर आघाडी होती. राज्यात 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या युतीत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने 91 जागांवर यश मिळवलं होतं. पिनराई विजयन यांच्यावर केरळी जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं दिसत आहे.
पुदुच्चेरीत पुन्हा भाजप
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत (Puducherry Assembly Election Result) भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला 4 जागांवर आघाडी दिसत आहे. एकूण 30 जागांपैकी 16 जागांवर मिळाल्या तर भाजपला ही निवडणूक जिंकता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam Election, Assembly Election 2021, Kerala Election, Mamata banerjee, Narendra modi, Tamil nadu Election, West Bengal Election