नवी दिल्ली, 09 मे: रविवारी संध्याकाळी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले असानी चक्रीवादळाचं (Hurricane Asani) रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. उत्तर-पश्चिम दिशेनं उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशा किनार्याकडे सरकल्यामुळे हे घडलं. भारतीय (Indian Meteorological Department) हवामानशास्त्र विभागा (IMD) नुसार, असनी उत्तर आंध्र-ओडिशा किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर मंगळवारी उत्तर-पूर्वेकडे वळण्याची शक्यता आहे.
सध्या पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजात म्हटलं आहे की, यानंतर बुधवारी तीव्र चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची आणि गुरुवारपर्यंत खोल दाबामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. असनीमुळे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
cyclonic storm ‘Asani’ intensified into a severe cyclonic storm at 1730 hours IST of today, the 8th May,over Southeast BoB, about 610 km northwest of Car Nicobar (Nicobar Islands).To move NW till 10th May night & reach Westcentral NW BoB off North Andhra Pradesh & Odisha coast pic.twitter.com/UZK31fLcxJ
— India Meteorological Department (@Indiametdept) May 8, 2022
11 मे रोजी असनी चक्रीवादळ आपला मार्ग बदलत भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या समांतर पुढे सरकणार आहे. तर 12 मे रोजी चक्रीवादळ कमकुवत होत डीप डीप्रेशनमध्ये परावर्तित होईल. 10 मे आणि 11 मे रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका हा ओडिशाला बसण्याची शक्यता आहे.
ओडिशात बचाव कार्यासाठी पुरेशी व्यवस्था
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला समांतर सरकेल आणि मंगळवारी संध्याकाळपासून पाऊस पडेल. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (SRC) पीके जेना म्हणाले की, राज्य सरकारने बचाव कार्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. ते म्हणाले, आम्हाला राज्यात कोणताही मोठा धोका दिसत नाही कारण ते पुरीजवळील किनार्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर जाणार आहे. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दल (ODRAF) आणि अग्निशमन सेवांचे बचाव पथक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. बालासोरमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असून ओडीआरएएफची एक टीम गंजम जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.
ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
पुरी जिल्ह्यातील कृष्णा प्रसाद, सातपारा, पुरी आणि अस्तरंग ब्लॉक आणि केंद्रपारा मधील जगतसिंगपूर, महाकालपाडा आणि राजनगर आणि भद्रक येथेही ODRAF टीम तयार आहेत. जेना म्हणाले की, सर्व जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
भुवनेश्वर हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास म्हणाले, चक्रीवादळाच्या प्रभावाखाली किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून पावसाशी संबंधित क्रियाकलाप सुरू होतील. मंगळवारी ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी गंजम, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. पुरी, जगतसिंगपूर, कटक, केंद्रपारा, भद्रक आणि बालासोरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मच्छीमारांना किनाऱ्यावर न जाण्याच्या सूचना
हवामान खात्यानं म्हटलं आहे की, चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या गंगेच्या किनारपट्टीवर मंगळवार ते शुक्रवार पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पाडण्याची शक्यता आहे, कोलकात्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन जोरदार पावसाची शक्यता आहे. कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम म्हणाले, हवामान खात्याच्या अंदाजानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क करण्यात आले आहे. ते म्हणाले की, मे 2020 मध्ये अम्फान चक्रीवादळाच्या विध्वंसक परिणामांपासून धडा घेत महापालिका प्रशासनानं पडलेल्या झाडे आणि इतर ढिगाऱ्यांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी क्रेन, विद्युत आरे आणि बुलडोझर (अर्थमूव्हर) सतर्क ठेवण्यासारख्या सर्व उपाययोजना केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Odisha, West bengal