मराठी बातम्या /बातम्या /देश /

बायकोसाठी कायपण! विवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम, पतीनं स्वतः लावून दिलं लग्न

बायकोसाठी कायपण! विवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम, पतीनं स्वतः लावून दिलं लग्न

विवाहानंतर बायकोला परपुरुषावर प्रेम झाल्यानं, नवऱ्याने त्याग करून आपल्या बायकोचं लग्न (Wife marriage with another man) अन्य पुरुषासोबत लावल्याची अनोखी घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

भागलपूर, 26 एप्रिल: लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोला अन्य व्यक्तीवर प्रेम (Love affair after marriage) झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण विवाहानंतर बायकोला एखाद्या परपुरुषावर प्रेम झाल्यानं, नवऱ्याने त्याग करून आपल्या बायकोचं लग्न (Wife marriage with another man) अन्य पुरुषासोबत लावण्याची अनोखी घटना समोर आली आहे. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर दोन लेकरांच्या आईला एका परपुरुषावर प्रेम झालं. त्यामुळे एका नवऱ्याने आपल्या बायकोचं परपुरुषासोबत लग्न लावून दिलं आहे. या घटनेची माहिती मिळताचं परिसरात बघ्यांची एकच गर्दी उडाली होती.

संबंधित घटना बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंज येथील आहे. खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंज याठिकाणी राहणाऱ्या उत्तम मंडल याच्याशी झालं होतं. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. पण कालांतराने संबंधित विवाहित महिलेचं नात्यातील एका अन्य युवकावर प्रेम झालं. त्यानंतर त्यांची जवळीक आणखी वाढत गेली.

आपल्या पत्नीचं एका वेगळ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पतिला मिळाली. त्यानंतर त्याने पत्नीचा विरोध केला. दोघांत अनेकदा भांडणही झाली. पण सपनाने संबंधित युवकासोबत आपले प्रेमसंबंध चालूच ठेवले. याला घरच्यांनी आणि नवऱ्याने सतत विरोध केला. पण सपनाने कोणाचंही ऐकलं नाही. त्यामुळे पत्नीच्या हट्टासमोर पतीनं गुडघे टेकून तिच्या दुसऱ्या लग्नाला सहमती दिली आहे. त्याने राजू कुमार नावाच्या आपल्या नात्यातील प्रियकर युवकासोबत लग्न लावून दिलं आहे.

हे ही वाचा- अवघे पाऊणशे वयमान! 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच...

सुल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात झालेल्या या लग्नात दोन्ही बाजूच्या परिवाराने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी संबंधित महिलेची दोन लेकरंही लग्नात उपस्थित होते. तर नवऱ्याच्या डोळ्यात अश्रूही होते. पण त्याने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर त्याग करून तिचं लग्न परपुरुषासोबत लावून दिलं आहे. अशा पद्धतीचं लग्न गावातील मंदिरात होतं असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वाद देखील दिले आहेत.

First published:

Tags: Bihar, India, Marriage, Wife and husband