गॅस गळतीनं विशाखापट्टणम पुन्हा हादरलं, 2 जणांचा जागीच मृत्यू

गॅस गळतीनं विशाखापट्टणम पुन्हा हादरलं, 2 जणांचा जागीच मृत्यू

या घटनेत आतापर्यंत 2 लोक ठार झाल्याची माहिती आहे. 4 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

विशाखापट्टणम, 30 जून : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे पुन्हा एकदा गॅस गळतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. औषधं तयार करणाऱ्या कंपनीत गॅस गळती झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत 2 लोक ठार झाल्याची माहिती आहे. 4 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायनर लाइफ सायन्सेस फार्मा कंपनीत ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परवाडा येथील जवाहरलाल नेहरू फार्मा सिटीमध्ये सोमवारी रात्री उशिरा बेंझ्मिडोल वेपर नावाचा विषारी गॅस बाहेर निघत असल्याची माहिती मिळाली. या कंपनीत काम करणारे 6 लोकांना त्रास झाला. त्यापैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका केमिकल फॅक्ट्रीत अशाच प्रकारे गॅस गळती झाली होती.

गॅस गळती झाली तेव्हा कंपनीमध्ये 30 कामगार काम करत होते. गॅस गळतीची माहिती मिळताच पोलीस, जिल्हाधिकारी आणि अग्निशमन दल व आपत्तीव्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाडे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परवाडा फार्मा सिटीच्या लाइफ सायन्स लॅबमध्ये गॅसची गळती झाली. विषारी वायूमुळे 4 लोकांचे प्रकृती बिघडली. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांना गजूवाका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचवेळी या दुर्घटनेत नरेंद्र आणि गौरी शंकर दोघांचा मृत्यू झाला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या