नवी दिल्ली, 28 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आम आदमी पार्टीच्या प्रमुखांना दिल्लीच्या शाहीनबाग जाण्याचे आव्हान केलं. तुम्ही तेथे गेलात तर दिल्लीच्या जनतेला विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हा निर्णय घेता येईल. शहा उत्तर पश्चिम दिल्लीच्या रिठाला येथे एका प्रचार सभेत म्हणाले की केजरीवाल आणि कॉंग्रेस नेता राहुल गांधी हे राम मंदिर आणि अनुच्छेद 370 च्या विरोधात होते. त्यांना देशाची प्रतिमा आणि सैनिकांची पर्वा नाही. विरोधकांना असं वाटतंय की आपण त्यांच्या वोट बॅंकेला छेद देऊ. यावर शहा यांनी जनतेला विचारलं की विरोधकांची वोट बॅंक कुठे आहे, यावर जनतेने उत्तर दिलं ‘शाहीनबाग’. यावेळी शहा म्हणाले, की मला केजरीवालला विचारायचं आहे ते शरजील इमामला पकडण्याबाबत सकारात्मक आहेत का? आपण शाहीनबागच्या लोकांसोबत आहात की नाही कृपया लोकांना सांगा, असं आवाहन शहा यांनी केलं आहे. या प्रचार सभेत शहा यांनी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देशाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव पर्याय असल्याचे ते यावेळी म्हणाले. सध्य़ा दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून सर्व पक्ष प्रचारात जुंपली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून CAA विरोधात प्रदर्शन सुरूअसल्याने हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे CAA आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी भाजपकडून पुरेपुर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा दिल्लीभर सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.