
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच समोर आलेली काही आकडेवारी ही दिलासा देणारी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली असली तरी मृत्यूदर हा जगात सर्वात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

10 लाख लोकांमध्ये जगाचा मृत्यूदर हा 110 एवढा असून त्याचं भारतातलं प्रमाण हे 48 असल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली.




