विमान प्रवासाच्या सुरुवातीला एअरहोस्टेस सुरक्षाविषयक सूचना देतात. नेहमी प्रवास करणाऱ्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. त्याकडे दुर्लक्षच केलं जातं. पण रविवारी मात्र हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या जेट एअरवेजच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना या सूचनांच्या वेळी एक सुखद धक्का बसला. तेलंगणात ९ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पारंपरिक बातुकम्मा उत्सव साजरा झाला. या ९ दिवसांच्या उत्सवात बातुकम्मा पारंपरिक गाणं गायलं जातं. एअर होस्टेसनी या पारंपरिक गाण्यावर उस्फूर्तपणे नाचायला सुरुवात केली आणि विमानातल्या प्रवाशांना हा एक वेगळा अनुभव मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.