मराठी बातम्या /बातम्या /देश /AIIMS च्या डॉक्टरांना मोठं यश,10 तासांत ऑपरेशन करून तुटलेला हात पुन्हा जोडला

AIIMS च्या डॉक्टरांना मोठं यश,10 तासांत ऑपरेशन करून तुटलेला हात पुन्हा जोडला

10 तासांची शस्रक्रिया करून एका मजुराचा मनगटापासून तुटलेला हात पूर्णपणे त्याच्या शरीराला जोडण्यात यश मिळवलं आहे.

10 तासांची शस्रक्रिया करून एका मजुराचा मनगटापासून तुटलेला हात पूर्णपणे त्याच्या शरीराला जोडण्यात यश मिळवलं आहे.

10 तासांची शस्रक्रिया करून एका मजुराचा मनगटापासून तुटलेला हात पूर्णपणे त्याच्या शरीराला जोडण्यात यश मिळवलं आहे.

जोधपूर, 11 जानेवारी: राजस्थानातील जोधपूरमध्ये असलेल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (AIIMS) तज्ज्ञ डॉक्टरांनी 10 तासांची शस्रक्रिया करून एका मजुराचा मनगटापासून तुटलेला हात पूर्णपणे त्याच्या शरीराला जोडण्यात यश मिळवलं आहे. हा रुग्ण आता हळूहळू बरा होत असून त्याच्यावर एम्समध्येच उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारीला हा अपघात घडला. इम्तियाज हा कामगार येथील एका फॅक्टरीमध्ये काम करतो. त्याच्या उजव्या हातावर मशीन पडल्यामुळे तो मनगटापासून संपूर्ण वेगळा झाला. घाईगडबडीत त्याच्या कामगार मित्रांनी त्याला तातडीने संध्याकाळी 6 वाजता जोधपूरमधील एम्स हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल केलं. हॉस्पिटलमधील प्लॅस्टिक सर्जरी विभागातील तज्ज्ञांनी रुग्णाची तपासणी केली. त्यांनी दोन टीम तयार करून हात जोडण्याचं ठरवलं. त्यांनी दोन्ही तुकड्यांतील महत्त्वाच्या शिरा जोडण्यासाठी तयारी केली. त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जननी दोन्ही हाडं सांधली. त्यानंतर प्लॅस्टिक सर्जनच्या टीमनी त्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली. 10 तास चाललेली ही शस्रक्रिया खूप जटिल होती.

हात नेहमीप्रमाणे काम करू शकेल

स्थानिक वृतपत्रांतील बातम्यांमध्ये म्हटलंय की डॉक्टरांनी पहिल्यांदा रक्त वाहून नेणाऱ्या शिरा जोडल्या. त्यानंतर त्यांनी इतर भागांची जोडणी केली. शस्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आणि त्याच्या हाताच्या हालचालींचं निरीक्षणही करण्यात आलं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याच्या हाताची झीज भरून निघाली की तो रुग्ण नेहमीप्रमाणे हाताचा वापर करू शकेल. ही शस्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांमध्ये अनेक विशेषज्ज्ञ होते. प्लॅस्टिक सर्जरी टीममध्ये डॉ. प्रकाशचंद्र काला, डॉ. पवन दीक्षित, डॉ. दीप्ती, डॉ. अनिकेत, डॉ. सौरभ, डॉ. सुरेश यांचा समावेश होता.

क्लिष्ट शस्रक्रिया योग्य वेळी होणं खूपच गरजेचं असतं. इम्तियाजला त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि डॉक्टरांनीही तातडीने त्याच्यावर उपचार केले त्यामुळे आज त्याचा हात वाचू शकला. वेळेवर आणि योग्य उपचार मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अशावेळी डॉक्टर हे देवासारखेच वाटतात.

First published:
top videos