नवी दिल्ली, 22 एप्रिल : देशातील कोरोनाची (Corona in India) दुसरी लाट वेगाने पसरत असून आता महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांमध्येही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यादरम्यान दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाचे डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 85 टक्के कोरोनाबाधित रुग्ण रेमडेसिवीर किंवा इतर कोणत्याही विशेष औषधाशिवाय बरे होत आहेत. ऑक्सिजन पातळी 94 टक्क्याहून कमी असल्यास अशा रुग्णांनाच विशेष उपचारांची गरज पडते. ज्यांची ऑक्सिजन पातळी 93 ते 94 टक्के आहे, त्यांना 98 ते 99 पर्यंत ऑक्सिजन पातळी नेण्यासाठी कोणत्याही उच्च प्रवाह ऑक्सिजनची गरज नाही, काहीजण विनाकारण ऑक्सिजनची मागणी करतात आणि अधून-मधून ऑक्सिजन वापरल्याने त्याचा कोरोना फार परिणाम होतोय असे कुठेही दिसून आलेले नाही, असेही ते म्हणाले. 5-7 दिवसांत रुग्ण बरे होतात बहुतेक लोकांना सर्दी, घसा खवखवणे इ. सारखी सामान्य लक्षणे दिसू लागतात आणि पाच ते सात दिवसांत ते उपचारांद्वारे या लक्षणांपासून बरेही होतात. केवळ 15 टक्के रुग्णांना आजाराच्या मध्यम टप्प्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. (हे वाचा - फक्त 131 रुपये गुंतवून मिळतील 20 लाख; सरकारची ही योजना माहिती आहे का? ) ..तर देशात ऑक्सिजन अपुरा पडेल मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ नरेश त्रेहान म्हणाले की, आपण ऑक्सिजनचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, विनाकारण ऑक्सिजन घेणाऱ्यांमुळे खरंच गरज असलेल्या एखाद्या तो मिळणार नाही. आणि अशाप्रकारे अधूनमधून ऑक्सिजन घेतल्याने त्याचा कोरोनावर कोणताही परिणाम आत्तापर्यंत दिसून आलेला नाही. ऑक्सिजनचा ‘सेफ्टी कवच’ म्हणून वापर करणे चुकीचे आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, ऑक्सिजनच्या अपव्ययांमुळे ज्यांना याची गरज आहे ते त्यापासून वंचित राहतील आणि देशातील एकूण ऑक्सिजन साठ्यावर त्याचा परिणाम होईल. (हे वाचा - ‘महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी?’ Remdesivir बाबत केंद्राच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी) दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. गेल्या चोवीस तासांत (बुधवारी) राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 568 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.54 टक्के एवढा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.