जाहिरात
मराठी बातम्या / देश / भंगारवाला आणि बाईकस्वाराचं अनोखं देशप्रेम, VIDEO पाहून कराल कडक सॅल्युट

भंगारवाला आणि बाईकस्वाराचं अनोखं देशप्रेम, VIDEO पाहून कराल कडक सॅल्युट

भंगारवाला आणि बाईकस्वाराचं अनोखं देशप्रेम, VIDEO पाहून कराल कडक सॅल्युट

अहमदाबादमध्ये अनोख देशप्रेम पाहायला मिळालं, भंगारवाला आणि बाईकस्वार यांचं हे देशप्रेम पाहून कराल कडक सॅल्युट

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद : दरवर्षी 15 ऑगस्ट म्हटलं की देशप्रेमला हुरुप येतो. त्या दिवशी झेंडे विकत घेतले जातात. मात्र स्वातंत्र्य दिन संपला की हा उत्साहही ओसरल्याचं पाहायला मिळतं. यंदाचं वर्ष मात्र खास आहे. देशात 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं हर घर तिरंगा मोहीम आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिनानंतरही लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अशी एक घटना न्यूज 18 च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याचा उत्साह अजूनही भारतीय नागरिकांच्या मनात आहे. हे घडलेल्या एका छोट्या प्रसंगातून दिसत आहे. हा व्हिडीओ सगळ्यांची मनं जिंकून घेणारा आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या अहमदाबाद शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. रिंगरोडवर भंगावरवाला तिरंगा घेऊन रिक्षाने जात होता. यावेळी स्पीड ब्रेकरमुळे सायकलवरील संतुलन बिघडलं आणि त्याच्या सायकलला लावलेला तिरंगा खाली पडला. त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने झटकन थांबून तो तिरंगा उचलला आणि स्वच्छ केला. त्यानंतर उचलून पुन्हा भंगारवाल्याला दिला. बाईकस्वार आणि भंगारवाला या दोघांच्याही मनात राष्ट्रध्वजासाठी असलेलं प्रेम यावेळी दिसलं. हा व्हिडीओ पाहून घटनास्थळावरील लोक काहीशी भावुक देखील झाले होते. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी आदराची भावना दिसत होती.

जाहिरात

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत देशातील नागरिकांनी सहभाग घेतला. प्रत्येक घरात तिरंगा लावण्याची मोहिम सुरू होती. या मोहिमेअंतर्गत हर घर तिरंगा वेबसाइटवर सहा कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तिरंग्यासोबत हे सेल्फी काढण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात